-
बिहार निवडणूक २०२५ चा निकाल आज जाहीर होणार आहे. मतमोजणी सुरू असून सर्वांचे लक्ष अलीनगर मतदारसंघाकडे आहे.
-
मैथिली ठाकूर ही अलीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. भाजपाने या वेळी या मतदारसंघात नवीन आणि तरुण उमेदवार उभे केले आहेत.
-
मैथिली ठाकूरच्या समोर आरजेडीचे वरिष्ठ नेते बिनोद मिश्रा आहेत, त्यामुळे अलीनगरमध्ये निवडणुकीस मोठा स्पर्धात्मक लढा अपेक्षित आहे.
-
मैथिली ठाकूर प्रसिद्ध गायिका असून तिला तिच्या भजन गाण्यांनी मोठी ओळख मिळाली आहे, हेच तीचे प्रमुख उत्पन्नाचे साधन आहे.
-
अभिनय व गायकीच्या कामातून ती महिन्याला १०-१२ शो करते. एका शोची फी ७-८ लाख रुपये असल्यामुळे तिचे मासिक उत्पन्न ७०-८० लाख रुपये आहे. वार्षिक उत्पन्न ७-९ कोटींच्यादरम्यान आहे.
-
निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, तिचे वार्षिक उत्पन्न ३.०४ कोटी रुपये असून, तिची संपत्ती १.५० कोटी रुपये (दिल्ली, द्वारका मधील फ्लॅट) इतकी आहे. २०२३-२४ च्या आयटीआरमध्ये तिने २८,६७,३५० रुपये उत्पन्न दाखवले आहे.
-
बिहारमध्ये आमदाराचा बेसिक पगार ५०,००० रुपये असून, क्षेत्रीय भत्ता ५५,०००, बैठक भत्ता ३,००० रुपये प्रतिदिन, PA भत्ता ४०,००० आणि स्टेशनरी भत्ता १५,००० रुपये मिळून मासिक कमाई १.४० लाख रुपये होते.
-
मात्र, विधायक होण्याचे फायदे फक्त आर्थिक नसून, सामाजिक प्रतिष्ठा, राजकीय प्रभाव, सरकारी सुविधा, विशेष प्रवास व मेडिकल सुविधा, वाहन कर्ज, भविष्यातील राजकीय संधी अशा अनेक गोष्टींमध्येही मिळतात. गायकीत कमाई जास्त असली तरी विधायक म्हणून सत्ता व प्रभाव अनंत असतात.
-
(सर्व फोटो सौजन्य : मैथिली ठाकूर/इन्स्टाग्राम)
Bihar Election Result 2025 Live Updates : बिहारमधील पराभव काँग्रेसला महाराष्ट्रात भोगावा लागणार? उद्धव ठाकरे गटानं मांडली स्पष्ट भूमिका