-

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने पुन्हा एकदा बहुमत मिळवले आहे, त्यामुळे राज्यात पुन्हा नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आतापर्यंत किती वेळा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे, तसेच देशात कोणत्या नेत्यांनी सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपद भूषवले, यावर पुन्हा एकदा लक्ष वेधले जात आहे. (फोटो सौजन्य :नितीश कुमार/फेसबुक)
-
निवडणुकीच्या निकालांनुसार बिहारमध्ये नितीश कुमार यांचे सरकार पुन्हा स्थापन होणार आहे, त्यामुळे त्यांनी किती वेळा मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली आणि राज्यकारभाराचे नेतृत्व केले याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. शिवाय देशातील सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तींच्या यादीत कोणाचे नाव अग्रस्थानी आहे हेही जाणून घेण्याची गरज आहे. (फोटो सौजन्य :नितीश कुमार/फेसबुक)
-
१ – पवन कुमार देशात सलग सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपद भूषवण्याचा मान सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांच्या नावावर आहे. त्यांनी सलग पाच कार्यकाळ पूर्ण केले असून त्यांचा एकूण कार्यकाळ तब्बल २४ वर्षे आणि १६५ दिवस इतका होता. आजही हा विक्रम तितकाच भक्कमपणे नोंदलेला आहे. (एक्सप्रेस फोटो)
-
२ – नवीन पटनायक ओडिशा- २४ वर्ष, ९९ दिवस (एक्सप्रेस फोटो)
-
३ – ज्योति बसु पश्चिम बंगाल- २३ वर्ष, १३७ दिवस (एक्सप्रेस फोटो)
-
४- गेगोंग अपांग अरुणाचल प्रदेश- २२ वर्ष, २५० दिवस (एक्सप्रेस फोटो)
-
५- लाल थनहवला मिझोराम- २२ वर्ष, ६० दिवस (एक्सप्रेस फोटो)
-
६- वीरभद्र सिंह हिमाचल प्रदेश- २१ वर्ष, १३ दिवस (एक्सप्रेस फोटो)
-
७ – माणिक सरकार त्रिपुरा- १९ वर्ष, ३६३ दिवस (एक्सप्रेस फोटो)
-
८ – एम. करुणानिधी तमिळनाडू- १८ वर्ष, ३६२ दिवस (एक्सप्रेस फोटो)
-
९ – प्रकाश सिंह बादल पंजाब- १८ वर्ष, ३५० दिवस (एक्सप्रेस फोटो)
-
10- नीतीश कुमार
बिहार- 18 वर्ष, 347 दिवस
राज्यात सर्वाधिक वेळा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा विक्रम नितीश कुमार यांच्या नावावर आहे. ते आजपर्यंत ९ वेळा मुख्यमंत्री झाले आहेत. यावेळी त्यांनी पुन्हा शपथ घेतल्यास हा आकडा १० वर पोहोचेल आणि ते देशातील सर्वाधिक वेळा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे नेते ठरतील. त्यांच्या या नव्या विक्रमाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
नितीश कुमार नवा इतिहास घडवणार? सर्वाधिक वेळा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या दिशेने वाटचाल
बिहारमध्ये पुन्हा भाजपा सरकार बनवण्याच्या तयारीत; नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री बनण्याची शक्यता, तर सर्वाधिक काळ सत्तेवर राहण्याचा विक्रम इतर नेत्यांच्या नावावर
Web Title: Bihar election result 2025 nitish kumar 10th oath bihar nda government longest serving cm record svk 05