-
शिवसेनेची (ठाकरे) मुलुख मैदान तोफ म्हणजे खासदार संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या कारणास्तव राजकारणापासून दूर आहेत. उपचारासाठी त्यांनी सार्वजनिक जीवनातून विश्रांती घेतली.
-
याची माहिती त्यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर दिली होती. तेव्हा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरून त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. तसेच विरोधकांनीही याचप्रकारची भावना व्यक्त केली होती.
-
आता संजय राऊत उपचार घेऊन घरी परतले आहेत. आज मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन संजय राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
-
राज ठाकरे आणि संजय राऊतांच्या भेटीबद्दल त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी माध्यमांना माहिती दिली.
ते म्हणाले, संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राज ठाकरे आले होते. याआधीही ते माझ्याकडून फोनवर प्रकृतीची माहिती घेत होते. -
जवळपास अर्धा ते पाऊनतास त्यांनी चर्चा केली. राज साहेबांनी सल्ला देताना सांगितले की, ज्याप्रमाणे तुमचा आजार आहे, त्याप्रमाणे तुम्ही अधिक सजग राहायला हवे.
-
लोकांमध्ये न मिसळता दीड महिना आराम करावा आणि नंतर पुन्हा एकदा जनतेमध्ये यावे, असाही सल्ला राज ठाकरेंनी दिल्याचे सुनील राऊत म्हणाले.
-
जवळपास २० वर्षांनी राज ठाकरे संजय राऊत यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आल्याचेही सुनील राऊत यावेळी म्हणाले.
-
राज ठाकरेंनी भेट घेण्याआधी काल एका खासगी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संजय राऊत यांची भेट घेतली
-
यापूर्वी त्यांनी फोनवरून संजय राऊत यांच्याशी संवाद साधत प्रकृतीविषयी काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. आता ताज्या भेटीचे फोटो माध्यमावर झळकले आहेत. मात्र या भेटीचा तपशील समोर येऊ शकलेला नाही.
-
ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर संजय राऊत युतीसाठी पूरक अशी भूमिका घेताना वारंवार दिसून आले. मात्र स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुका होत असताना ते प्रकृतीच्या कारणास्तव यातून बाजूला झाले आहेत.
गॅस अॅसिडिटी कधीच होणार नाही, सकाळीच पोट झटक्यात होईल साफ; फक्त आठवड्यातून दोनदा ‘ही’ भाजी खा