-
रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे गुरुवारी (४ डिसेंबर) सायंकाळी नवी दिल्ली येथे आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालम विमानतळावर त्यांचे स्वागत केले. (PC : @mfa_russia/X)
-
पुतिन यापूर्वी ६ डिसेंबर २०२१ रोजी २१व्या शिखर परिषदेनिमित्त भारतात आले होते. युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे (PC : @mfa_russia/X)
-
पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांच्यासाठी खास मेजवानीचे आयोजन केले होते. उभय नेत्यांत शुक्रवारी भारत-रशिया वार्षिक शिखर परिष होईल. (PC : @narendramodi/X)
-
मोदी व पुतिन यांच्यात २०३० पर्यंत भारत-रशिया आर्थिक भागीदारीचा जाहीरनामा, ‘युरेशियन इकॉनिॉमिक युनियन’शी मुक्त व्यापार करारामध्ये प्रगती, श्रमिक देवाणघेवाण करार करणे आणि आर्क्टिक खंडावर जहाजबांधणी या मुद्द्यावर चर्चा होऊन निर्णय घेतले जातील. (PC : @narendramodi/X)
-
दरम्यान, पुतिन यांना भेटल्यानंतर मोदी यांनी समाजमाध्यमांवर त्यांचे व पुतिन यांचे अनेक फोटो शेअर केले आहेत. (PC : @narendramodi/X)
-
मोदी यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की माझे मित्र, रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचं भारतात स्वागत करताना मला मनस्वी आनंद होत आहे. आज संध्याकाळी आणि उद्या आमच्यात होणाऱ्या चर्चेची मी वाट पाहतोय. (PC : @narendramodi/X)
-
पंतप्रधान मोदी म्हणाले, भारत व रशियाची मैत्री काळाच्या कसोटीवर खरी उतरली आहे. या मैत्रीचा आपल्या लोकांना खूप फायदा झाला आहे. (PC : @narendramodi/X)
-
दुसऱ्या बाजूला रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील या भेटीबद्दल समाजमाध्यमांवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये म्हटलं आहे की रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर गेले आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप उत्साहात पुतिन यांचं स्वागत केलं. (PC : @narendramodi/X)
-
असा असेल पुतिन यांचा कार्यक्रम
पुतिन यांचा अधिकृत कार्यक्रम आज (५ डिसेंबर) सकाळी सुरू झाला. राष्ट्रपती भवनात त्यांनी राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतली. आता ते राजघाट येथे स्मृतिस्थळावर श्रद्धांजली वाहण्यासाठी जातील. त्यानंतर ते हैदराबाद हाऊसला जातील. पाठोपाठ शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. (PC : ANI)
Photos:हनिमूनसाठी अनुष्का-मेघन थायलंडच्या किनाऱ्यावर; नारिंगी स्वीमिंग सूटमधील फोटोंनी वेधले लक्ष