-
Millionaire Candidates Mumbai Election Results 2026: मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) २२७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज, १६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर होत आहेत.
-
सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून आतापर्यंत हाती आलेले महत्त्वाचे कल आणि निकाल खालीलप्रमाणे आहेत.
-
मुलुंडमधील भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रभाकर शिंदे यांचा पराभव झाला आहे. त्यांच्या मालमत्तेत नऊ वर्षांत संपत्तीत सुमारे ६ कोटींची वाढ झाली आहे.
-
भाजपाचे प्रकाश गंगाधरे विजयी झाले आहेत. त्यांच्या मालमत्तेत १० कोटींची भर पडली आहे.
-
किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या विजयी झाले असून त्यांच्या मालमत्तेत ८ कोटींची वाढ झाली आहे.
-
५ कोटी १५ लाखांची संपत्ती असणाऱ्या तेजस्वी घोसाळकर यांनी १० हजार मतांच्या फरकाने बाजी मारली.
-
४६ कोटी ३४ लाखांची मालमत्ता असलेल्या माजी महापौर श्रद्धा जाधव पुन्हा विजयी झाल्या आहेत.
-
माजी महापौर किशोरी पेडणेकर विजयी झाले आहेत. त्यांची मालमत्तेत ४ कोटींची वाढ नोंदवण्यात आली आहे.
-
माजी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे विजयी झाले आहेत. त्यांच्याकडे २५ कोटींची मालमत्ता आहे.
-
खासदार रवींद्र वायकर यांच्या कन्या दीप्ती वायकर यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे.
-
माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव विजयी झाले आहेत. त्यांची मालमत्ता विधानसभा निवडणुकीतील १० कोटींवरून आता १४ कोटींवर गेली आहे.
-
सर्वाधिक ३७ कोटींची संपत्ती वाढलेले समाधान सरवणकर यांचा निशिकांत शिंदे यांनी पराभव केला.
-
माजी आमदार सदा सरवणकर यांची कन्या प्रिया सरवणकर पिछाडीवर आहेत. यांच्याकडे १२ कोटींची मालमत्ता आहे.
-
दहिसरमधील उमेदवार संजय घाडी विजयी झाले आहेत. २०१७ च्या तुलनेत ९ कोटींची वाढ होऊन आता १२ कोटी ८४ लाखांची मालमत्ता आहे.
-
मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार यांच्याकडे ७ कोटींची मालमत्ता आहे.
पुन्हा जंतर मंतर! अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात कॉक्रोच जनता पार्टीचा ७ नोव्हेंबरला SIR विरोधात एल्गार; दिल्लीतील अटकेनंतर पहिलंच मोठं आंदोलन