-
CM Devendra Fadnavis On Maharashtra Municipal Corporation Election Results 2026: महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, महायुतीने मिळवलेल्या विजयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
-
“हा विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर आणि विकासाच्या राजकारणावर जनतेने टाकलेला विश्वास आहे,” अशा शब्दांत त्यांनी मतदारांचे आभार मानले.
-
कार्यकर्त्यांना संबोधित करताना फडणवीस म्हणाले की, “आजचा दिवस ऐतिहासिक आहे.
-
२९ पैकी तब्बल २५ महानगरपालिकांमध्ये आपण सत्ता स्थापनेच्या दिशेने आहोत.
-
जुने सर्व रेकॉर्ड मोडीत काढून जनतेने आपल्याला भरभरून आशीर्वाद दिले आहेत.
-
मुंबई महानगरपालिकेवरही महायुतीचाच भगवा फडकेल, यात आता शंका उरलेली नाही.”
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे नमूद केले की, “हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो होतो.
-
महाराष्ट्रातील जनतेला प्रामाणिक कारभार आणि वेगवान विकास हवा आहे, हेच या निकालातून स्पष्ट झाले आहे.”
पुन्हा जंतर मंतर! अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात कॉक्रोच जनता पार्टीचा ७ नोव्हेंबरला SIR विरोधात एल्गार; दिल्लीतील अटकेनंतर पहिलंच मोठं आंदोलन