-
राज्यातील विविध महानगरपालिकांच्या निवडणुकांची मतमोजणी सध्या सुरू असून काही जागांचे निकाल जाहीर झाले आहेत.
-
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांचे वर्चस्व पाहायला मिळत आहे.
-
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर याने जालना महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक १३ मधून अपक्ष म्हणून विजय मिळवला आहे.
-
विजयानंतर श्रीकांत पांगारकरने आपल्या समर्थकांसह जल्लोष साजरा केला.
-
सोलापूर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक २ (क) मध्ये भाजपाच्या उमेदवार शालन शिंदे यांचा विजय झाला आहे.
-
प्रभाग दोनमध्ये उमेदवारी मागे घेण्याच्या वादातून मनसेचे युवा नेते बाळासाहेब सरवदे यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात शालन शिंदेंच संशयित आऱोपी आहेत.
-
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सोनाली आंदेकर यांनी प्रतिभा धंगेकर यांचा पराभव करत विजय मिळवला.
-
विशेष म्हणजे, आयुष कोमकर हत्या प्रकरणात सोनाली आंदेकर या सध्या तुरुंगात आहेत.
BMC Mumbai Winner Candidate List 2026 : मुंबईतील कोणत्या वॉर्डमधून कोण जिंकलं? विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर!