-
Mumbai BMC Election Results 2026: मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या निकालांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
मुंबईच्या सत्तेच्या चाव्या कुणाकडे जाणार याची चुरस असतानाच, मुंबईचा ‘मराठी पट्टा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागांत मात्र शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपले वर्चस्व (ShivSena UBT) पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
-
विशेषतः वरळी, दादर, परळ आणि लालबाग यांसारख्या पारंपरिक बालेकिल्ल्यांमध्ये ठाकरेंचा (Uddhav Thackeray) आवाज घुमला असून, १७ महत्त्वाच्या प्रभागांपैकी तब्बल १४ जागांवर ठाकरे गट आणि मनसेच्या युतीने विजय मिळवला आहे.
-
निवडणुकीपूर्वी शिंदे गट (Eknath Shide) आणि भाजपाच्या (BJP) महायुतीने ठाकरेंचा हा अभेद्य गड फोडण्यासाठी मोठी ताकद लावली होती.
-
मात्र, मतदारांनी पुन्हा एकदा शिवसेनेच्या (UBT) जुन्या आणि निष्ठावान शिलेदारांवर विश्वास दाखवला आहे.
-
शिवसेना ठाकरे गटाने १२ जागांवर विजय मिळवून आपला भगवा कायम राखला, तर राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेने २ जागांवर बाजी मारली आहे.
-
शिवसेना (ठाकरे गट) – १२ विजयी उमेदवार : मराठी पट्ट्यात पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या दिग्गज महिला नेत्यांनी आपली पकड कायम ठेवली आहे. यामध्ये माजी महापौर श्रद्धा जाधव, किशोरी पेडणेकर आणि विशाखा राऊत यांनी दिमाखदार विजय मिळवला. तसेच सचिन पडवळ, किरण तावडे, श्रद्धा पेडणेकर, अबोली खाड्ये, पद्मजा चेंबूरकर, विजय भणगे, निशिकांत शिंदे आणि हेमांगी वरळीकर या उमेदवारांनी आपापल्या प्रभागात प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारली आहे.
-
मनसे – २ विजयी उमेदवार : राज ठाकरे यांच्या मनसेनेही (MNS) या मराठी पट्ट्यात आपले अस्तित्व दाखवून दिले असून सुप्रिया दळवी आणि यशवंत किल्लेदार यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे.
रमेश म्हात्रेच्या भेटीसाठी डोंबिवलीतील समर्थक गोव्यात; अंजुनी रिसाॅर्टवर भेटण्यासाठी व्यावसायिक वाहनांची सोय