-
Richest Nagarsevak in Mumbai BMC Wealth in Crore: मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणूक २०२६ चे निकाल नुकतेच जाहीर झाले असून, नवनियुक्त नगरसेवकांच्या संपत्तीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
-
देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबईत यंदा अनेक कोट्यधीश लोकप्रतिनिधी निवडून आले आहेत. पाहा, कोण आहेत मुंबईतील सर्वात श्रीमंत नगरसेवक…
-
कुलाबा (वॉर्ड क्र. २२६) मधून निवडून आलेले भाजपाचे मकरंद नार्वेकर हे सलग तिसऱ्यांदा नगरसेवक बनले आहेत.
-
२०१७ मध्ये त्यांची संपत्ती केवळ ₹६.३ कोटी होती, जी आता तब्बल २० पटीने वाढून ₹१२४ कोटींवर पोहोचली आहे.
-
भाजपाचे नगरसेवक चंदन शर्मा हे या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती ₹८४.७७ कोटी इतकी आहे.
-
मकरंद नार्वेकर यांच्यासह त्यांच्या वहिनी हर्षिता नार्वेकर देखील सर्वाधिक श्रीमंत नगरसेवकांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
-
भाजपाची नगरसेविका हर्षिता नार्वेकर यांच्या कडे ६३ कोटी रुपये इकती संपत्ती आहे.
-
शिवसेना (शिंदे गट)च्या नगरसेविका मिनल तुर्डे या सत्ताधारी पक्षातील सर्वात श्रीमंत महिला नगरसेविकांपैकी एक आहेत. त्यांची एकूण मालमत्ता ₹५५.१७ कोटी आहे.
-
काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेल्या तुलिप मिरांडा या मुंबईतील पाचव्या सर्वात श्रीमंत नगरसेविका आहेत. त्यांची संपत्ती ₹५०.६९ कोटींच्या घरात आहे.
-
माजी महापौर आणि शिवसेना (ठाकरे गट) च्या अनुभवी नेत्या श्रद्धा जाधव यांची संपत्ती ₹४६.३४ कोटी इतकी आहे.
-
भाजपाच्या नगरसेविका अनिता वैती यांनीही या श्रीमंत लोकप्रतिनिधींच्या यादीत स्थान मिळवले असून त्यांची एकूण संपत्ती ₹२८.८८ कोटी आहे.
-
भाजपाच्याच नगरसेविका हेतल गाला या यादीत आठव्या क्रमांकावर असून त्यांच्याकडे ₹२७.९३ कोटींची मालमत्ता आहे.
-
शिवसेनेचे (ठाकरे गट) नगरसेवक आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांची एकूण संपत्ती ₹२५.८४ कोटी इतकी नोंदवण्यात आली आहे.
‘सुरुवातीच्या काळात अशा प्रकारच्या गाजावाजाची गरजच…’, तुकाराम मुंढेंबद्दल BMC आयुक्त अश्विनी भिडे काय म्हणाल्या?