-
आपल्या खास शैलीतील डायलॉग्स आणि रिल्सच्या जोरावर तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेला प्रसिद्ध मराठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमचे (Prathamesh Kadam) अकाली निधन झाले आहे.
-
गेल्या काही दिवसांपासून तो आजारपणाशी झुंज देत होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
-
प्रथमेशच्या निधनामुळे सोशल मीडिया विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्याचे सहकारी आणि चाहते हळहळ व्यक्त करत आहेत.
-
त्याचा जवळचा मित्र आणि इन्फ्लुएन्सर तन्मय पाटेकरने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या.
-
तन्मयने म्हटले की, “तू सदैव आठवणीत राहशील प्रथमेश, देवाघरी स्वतःची काळजी घे रे! तुझी खूप आठवण येईल. मिस यू भाई!”
-
प्रथमेश हा केवळ एक रील स्टार नव्हता, तर आपल्या कुटुंबाचा मुख्य आधार होता.
-
काही वर्षांपूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते, त्यानंतर संपूर्ण घराची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती.
-
अत्यंत कष्टाने त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण केली होती.
-
प्रथमेशच्या प्रत्येक व्हिडिओला हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळायच्या. त्याच्या निधनाची बातमी समजताच इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चाहत्यांनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रथमेश कदम व तन्मय पाटेकर/इन्स्टाग्राम)
झोपल्यानंतर तुमच्याही तोंडातून लाळ गळते का? मग दुर्लक्ष करू नका; कारणे आणि उपाय समजून घ्या