-
Maharashtra Deputy CM Ajit Pawar Political Journey & Biography: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) नेते अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झाले आहे.
-
अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी देवळाली प्रवरा, राहुरी तालुका, अहमदनगर जिल्हा येथे झाला.
-
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी हे त्यांचे मूळगाव आहे.
-
अजित पवार यांचं शिक्षण बी.कॉम पर्यंत झाले आहे.
-
१९८२ – राजकारणात प्रवेश, त्यावर्षी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवड.
-
१९९१ – पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड, १६ वर्ष पदावर.
-
१९९१ – सर्वप्रथम बारामतीमधून लोकसभेवर, नंतर काका शरद पवार यांच्यासाठी खासदारकीचा राजीनामा.
-
१९९५, १९९९, २००४, २००९ आणि २०१४, २०२१९, २०२४ असे सलग सात वेळा विधानसभेवर.
-
कृषी आणि ऊर्जा राज्यमंत्री – जून १९९१ ते नोव्हेंबर १९९२
-
पाणीपुरवठा, ऊर्जा आणि नियोजन राज्यमंत्री – नोव्हेंबर १९९२ ते फेब्रुवारी १९९३
-
पाटबंधारे मंत्री (कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे), फलोत्पादन : ऑक्टोबर १९९९ ते जुलै २००४
-
ग्रामीण विकास, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, पाटबंधारे मंत्री (कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) : जुलै २००४ ते नोव्हेंबर २००४
-
जलसंपदा मंत्री (कृष्णा खोरे पाटबंधारे वगळून), जलसंपदा आणि स्वच्छता : नोव्हेंबर २००४ ते नोव्हेंबर २००९
-
जलसंपदा मंत्री (कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे वगळून), ऊर्जा : नोव्हेंबर २००९ ते नोव्हेंबर २०१०
-
उपमुख्यमंत्री (वित्त, नियोजन आणि ऊर्जा): नोव्हेंबर २०१० ते सप्टेंबर २०१२
-
उपमुख्यमंत्री (वित्त, नियोजन आणि ऊर्जा): डिसेंबर २०१२ ते सप्टेंबर २०१४
-
उपमुख्यमंत्री : २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०१९
-
उपमुख्यमंत्री : ३० डिसेंबर २०१९ ते २९ जून २०२२
-
विरोधी पक्षनेते : ४ जुलै २०२२ ते ३० जून २०२३
-
उपमुख्यमंत्री : २ जुलै २०२३ ते २६ नोव्हेंबर २०२४
-
उपमुख्यमंत्री : ५ डिसेंबर २०२४
-
ऑगस्ट २००६ ते १९ ऑगस्ट २०१८ – महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष.
-
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष.
Viral Dance Video: ‘इश्क तेरा तडपावे..’ गाण्यावर हार्दिक- इशानचा भन्नाट डान्स! अदिती हुंडिया अन् महिका शर्माच्या डान्सने वेधलं लक्ष, पाहा Video