-
Maharashtra Deputy CM Ajit Pawar Death in Baramati Plane Crash: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज, २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
-
या भीषण घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
-
या अपघातात अजित पवारांसह एकूण पाच जणांचा (३ प्रवासी आणि २ क्रू मेंबर्स) मृत्यू झाला आहे.
-
अपघातग्रस्त विमान ‘व्हीएसआर व्हेंचर्स प्रा. लि.’ (VSR Ventures Pvt. Ltd.) या कंपनीच्या मालकीचे होते.
-
अपघातावेळी हे विमान ‘VT-SSK’ या नोंदणी क्रमांकासह कार्यरत होते (मॉडेल: Learjet 45).
-
अपघात इतका भीषण होता की विमानाने जमिनीवर आदळताच पेट घेतला. विमानातील कोणालाही वाचवण्यात यश आले नाही.
-
हे एक खासगी ‘बिझनेस जेट’ असून सहसा व्हीआयपी व्यक्तींच्या जलद प्रवासासाठी वापरले जाते.
-
‘व्हीएसआर व्हेंचर्स’च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानामध्ये कोणतीही तांत्रिक बिघाड नव्हता.
-
व्हीएसआरचे अधिकारी विजय कुमार सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, विमान तांत्रिकदृष्ट्या १००% सुरक्षित होते आणि वैमानिकही अनुभवी होते.
-
प्राथमिक अंदाजानुसार, कमी दृश्यमानता हे अपघाताचे कारण असू शकते, मात्र ‘डीजीसीए’च्या (DGCA) चौकशीनंतरच नेमके सत्य समोर येईल.
-
छोटेखानी विमान असल्यामुळे ते छोट्या विमानतळावर उतरू शकत असे आहे.
-
(सर्व फोटो – अरुल होरायझन, इंडियन एक्सप्रेस)
भारताने सोने खरेदी थांबवल्यास काय होईल? सोन्याच्या किमती वाढणार की कोसळणार? तज्ज्ञांचे मत काय?