-
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे आज, २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या एका दुर्दैवी विमान अपघातात निधन झाले.
-
या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
-
त्यांच्या अंत्यदर्शनासाठी बारामतीत मेडिकल कॉलेजबाहेर समर्थकांची गर्दी उसळली आहे.
-
तर, संपूर्ण पवार कुटुंबही बारामतीत दाखल झाले आहेत.
-
उद्या, २९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
-
राज्य सरकारने २८ ते ३० जानेवारी या कालावधीत तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे.
-
दरम्यान, अजित पवारांचं पार्थिव आज सायंकाळी ४ वाजल्यापासून विद्याप्रतिष्ठान विद्यानगरी चौक येथील मैदानात अंत्यदर्शनाकरता रात्री उशिरापर्यंत नागरिकांसाठी ठेवण्यात येणार आहे.
-
उद्या (२९ जानेवारी) सकाळी ९ वाजता गदिमा सभागृहापासून अंत्ययात्रा निघेल.
-
गदिमा चौक, विद्यानगरी चौक, विद्याप्रतिष्ठानचा अंतर्गत रस्ता, मराठी शाळेच्या गेटने विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर जाईल. सकाळी ११ वाजता विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार होईल.
अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाच्या कंपनीची पहिली प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “अपघाताचे कारण…”