-
Ajit Pawar Funeral Updates: काटेवाडी, बारामती येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शासकीय मानवंदना देण्यात आली.
-
काल (२८ जानेवारी) बारामती येथे झालेल्या एका चार्टर विमान अपघातात अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले.
-
यावेळी त्यांचे कुटुंबीय पत्नी सुनेत्रा पवार, आणि मुले पार्थ व जय पवार उपस्थित होते.
-
पवार कुटुंबासह राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
-
अजित पवारांना शासकीय मानवंदना देण्यात आली असून काटेवाडीतून त्यांचं पार्थिव आता विद्याप्रतिष्ठान येथे आणण्यात येत आहे.
-
‘अमर रहे अमर रहे अजित दादा अमर रहे’च्या घोषणा कार्यकर्त्यांकडून दिल्या जात आहेत.
-
अजित पवारांच्या अंत्ययात्रेसाठी शरद पवार विद्याप्रतिष्ठान येथे पोहोचले.
-
माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे अजित पवारांचं अंतिम दर्शन घेण्याकरता विद्याप्रतिष्ठान येथे दाखल झाले आहेत.
-
राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पवार कुटुंबाची भेट घेतली. रश्मी ठाकरे यांनी सुनेत्रा पवारांचं सांत्वन केले.
-
सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
