-
महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. आज बारामतीत त्यांची अंत्ययात्रा निघाली. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राची कधीही न भरुन येणारी हानी झाली आहे. ( ALL photographs by Arul Horizon, Indian Express)
-
अजित पवार यांना अखेरचा निरोप देताना सगळ्यांचेच डोळे पाणावले होते.
-
अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याआधी पार्थ पवार आणि जय पवार यांनी उपस्थितांना हात जोडून अभिवादन केलं तो क्षण
-
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी असंख्य लोक मैदानावर उपस्थित होते.
-
अजित पवारांवर प्रेम करणारे असंख्य लोक अशा पद्धतीने हातात पोस्टर घेऊन स्तब्धपणे आपल्या लाडक्या दादांना निरोप देण्यासाठी उभे होते.
-
अजित पवारांच्या पार्थिवाला पुष्पांजली वाहतना छगन भुजबळ
-
अजित पवार गेले म्हणजे माझा मोठा भाऊच गेल्याची भावना माझ्या मनात आहे असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं होतं. एकनाथ शिंदे अजित पवारांना अखेरचा निरोप देताना.
-
दिलदार आणि दमदार मित्र निघून गेला आहे असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या निधनानंतर खंत व्यक्त केली.
-
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अजित पवारांना आदरांजली वाहिली तो क्षण
-
अजित पवार गेले म्हणजे आपल्या घरातला माणूस गेल्याची भावना प्रत्येक बारामतीकरांच्या मनात दिसली.
-
अजित पवारांना अखेरचा निरोप देताना या जनसागराच्या रुपाने बारामतीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला यात शंकाच नाही.
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
