-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री म्हणून राज्याच्या कामकाजात सहभागी होणार आहेत. धाराशीवचे ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी असलेल्या सुनेत्रा यांना लहानपणापासूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले आहे.
-
१९८० मध्ये अजित पवारांशी विवाह झाल्यानंतर त्या कुटुंबाच्या जबाबदारीत व्यग्र होत्या. मात्र, प्रत्यक्ष राजकारणात नसतानाही बारामतीतील शेती आणि समाजकारणात त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग राहिला आहे.
-
त्यांनी बारामतीमध्ये ‘एन्व्हायर्न्मेंटल फोरम ऑफ इंडिया’ ही सामाजिक संस्था स्थापन केली. या माध्यमातून त्यांनी पर्यावरण रक्षण आणि स्वच्छतेच्या चळवळीत मोलाचे योगदान दिले आहे.
-
महिलांच्या हाताला काम मिळावे यासाठी त्यांनी बारामतीत ‘टेक्स्टाईल पार्क’ची उभारणी केली. २००६ पासून त्या या पार्कच्या अध्यक्ष असून, आज हजारो महिलांना तिथे रोजगार उपलब्ध झाला आहे.
-
शिक्षण क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. नामांकित ‘विद्या प्रतिष्ठान’ संस्थेच्या विश्वस्त म्हणून त्या शैक्षणिक धोरणातही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
-
२०२४ ची लोकसभा निवडणूक हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील मोठा टप्पा ठरला. बारामती मतदारसंघातून त्यांनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अत्यंत चुरशीची लढत दिली होती.
-
लोकसभेतील पराभवानंतर पक्षाने त्यांच्यावर विश्वास दर्शवला. जून २०२४ मध्ये त्यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आणि त्या संसदेत पोहोचल्या.
-
अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय संकटात त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. पक्षाने आता त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करून, त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
-
आज संध्याकाळी त्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. राज्याच्या इतिहासात उपमुख्यमंत्रिपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या महिला नेत्या ठरतील. हा त्यांच्या कारकिर्दीचा सर्वोच्च बिंदू आहे. (सर्व फोटो सौजन्य: सुनेत्रा पवार/इन्स्टाग्राम)
याला म्हणतात नशीब! ६ फेब्रुवारी तारीख ५ राशींचं नशीब पालटणारी, पॉवरफुल नवपंचम योगानं पैसा दुप्पट, धनलाभाचे संकेत आजपासूनच..
