-
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत अर्थसंकल्प २०२६ सादर करून देशाचा नवीन आर्थिक आराखडा मांडला.
-
देशाच्या प्रगतीची ‘रिफॉर्म एक्सप्रेस’ सुसाट धावत असल्याचे नमूद करत त्यांनी आरोग्य आणि औषध निर्मिती क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.
-
भारताला औषध निर्मितीमध्ये जागतिक केंद्र (Global Hub) बनवण्यासाठी सरकारने पुढील ५ वर्षांसाठी ‘बायो-फार्मा शक्ती’ ही महत्त्वाकांक्षी योजना प्रस्तावित केली आहे.
-
या नव्या धोरणामुळे सर्वात मोठा फायदा सामान्य रुग्णांना होणार आहे. कॅन्सर (कर्करोग) आणि डायबेटिस (मधुमेह) सारख्या गंभीर आजारांवरील महागडी औषधे आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील.
-
बायोफार्म आणि सेमीकंडक्टर क्षेत्राला गती देण्यासाठी सरकारने अर्थसंकल्पात अनेक महत्त्वपूर्ण तरतुदी केल्या आहेत.
-
विशेषतः या क्षेत्रातील लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (SMEs) १० हजार कोटींच्या ‘SME ग्रोथ फंड’ची घोषणा करण्यात आली आहे.
-
देशाला जागतिक बायो-फार्मा उत्पादन केंद्र बनवण्यासाठी सरकारने ‘बायो फार्मा शक्ती’ योजनेचा नवा प्रस्ताव ठेवला आहे.
-
या योजनेमुळे देशात जैविक औषधांच्या (Biologics) उत्पादनासाठी एक सक्षम इकोसिस्टम तयार होईल.
-
भारताला बायोफार्मास्युटिकल हबमध्ये रूपांतरित केल्यामुळे महागडी औषधे आता परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होतील.
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
