-
आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्प २०२६ सादर केला असून यात कर सवलतींबाबत काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत.
-
यामध्ये सर्वसामान्यांच्या खिशाला दिलासा देणाऱ्या अनेक कर सवलतींची घोषणा करण्यात आली आहे.
-
देशातील करदात्यांसाठी सर्वात मोठी घोषणा म्हणजे १ एप्रिल २०२६ पासून संपूर्ण भारतात नवीन आयकर कायदा लागू केला जाणार आहे.
-
आरोग्य आणि शिक्षणासाठी आकारल्या जाणाऱ्या टीसीएस (TCS) दरात मोठी कपात करण्यात आली असून आता तो ५ टक्क्यांवरून थेट २ टक्क्यांवर आणली आहे.
-
अपघाती विम्यातून मिळणाऱ्या रकमेवर आता कोणत्याही प्रकारचा टॅक्स लागणार नसल्याची महत्त्वाची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
-
तंत्रज्ञान क्षेत्राला बळ देण्यासाठी क्लाउड सर्व्हिसेस पुरवणाऱ्या परदेशी कंपन्यांना २०४७ पर्यंत करातून पूर्णपणे मुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
-
शिक्षण आणि वैद्यकीय उपचारांसाठी परदेशात पैसा पाठवणे आता स्वस्त होणार असल्याने मध्यमवर्गीय कुटुंबांना या निर्णयाचा मोठा फायदा होईल.
-
डिजिटल पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी परदेशी तंत्रज्ञान कंपन्यांना दिलेली ही करमाफी भारताला जागतिक तंत्रज्ञानाचे केंद्र बनवण्यासाठी साहाय्यक ठरेल.
Sunetra Pawar Oath : सुनेत्रा पवार यांचा शपथविधी बेकायदेशीर, पुन्हा शपथ घ्यावी लागणार?, शपथविधीच्या चार दिवसांतच…
