-
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला विमान अपघातात मृत्यू झाला.
-
ज्यामुळे अवघा महाराष्ट्र हळहळला. त्यांना अखेरचा निरोप देताना बारामतीसह महाराष्ट्राचे डोळे पाणावले होते.
-
पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. तसेच काम करणारा लोकनेता गेला, अशी भावना जनतेच्या मनात होती आणि आहे
-
अजित पवार यांचा धाकटा मुलगा जय पवार यांनी अजित पवारांची फोटो स्टोरी ठेवत दुःख व्यक्त केले आहे.
-
फोटो शेअर करत ‘Dad काश, वेळ थांबली असती… मी तुम्हाला घट्ट मिठीत घेऊन आयुष्यभर तसाच राहिलो असतो’ अशी कॅप्शन त्यांनी शेअर केली आहे.
-
“miss you dad a lot” अस लिहीत जय पवार यांनी अजित पवार यांची आठवण येत असल्याचे सांगितले आहे.
-
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक शिस्तप्रिय आणि कामाचा माणूस म्हणून अजितदादांची ओळख कायम राहील.
-
जय पवार यांनी सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या भावनांमधून वडिलांबद्दलचे प्रेम आणि अपार दुःख दिसून येत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: जय पवार/इन्स्टाग्राम)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
