-
मंगळवारी, (३ फेब्रुवारी) सायंकाळी पाचच्या सुमारास खोपोलीजवळील आडोशी बोगद्याजवळ अत्यंत ज्वलनशील गॅस (प्रोपेलिन) वाहतूक करण्याऱ्या टँकरचा अपघात झाला होता
-
अपघातानंतर १६ तास उलटले असले तरी अजून पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर वाहतूक कोंडी आहे.
-
अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्त वाहन रसत्याच्या एका बाजूला सरकावण्यात आले आहे पण गॅसची गळती सुरू असल्याने वाहतूक सुरू करण्यात आली नाही.
-
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. ठिकठिकाणी ब्लॉक घेण्यात आले आहेत.
-
द्रतगती महामार्गावर असलेल्या लोणावळा आणि खोपोली शहर परिसरातही मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
-
वाहतूक कोंडीत अडकल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. महामार्गावर पिण्यासाठी पाणीही नसल्याने प्रवाशांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे.
-
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर आडोशी बोगद्याजवळ प्रोपेलिन गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात झाला आहे. या ठिकाणी गॅस गळतीचे प्रमाण वाढल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईकडे जाणारी लेन पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांनी पर्यायी मार्ग म्हणून ताम्हिणी घाटातून जाणाऱ्या रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन राष्ट्रीय महामार्ग वाहतूक पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी केले आहे.
-
पर्यायी मार्ग:
१) चांदणी चौक – ताम्हिणी घाट – रायगड मार्गे मुंबई (पुणे-पिरंगुट-पौड-मुळशी-ताम्हिणी घाट- वरचीवाडी-साजे-नांदगाव-पाली-पेडली-दुरशेत-उंबारेनंतर पुढे पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग)
२) आळे फाटा – माळशेज घाट – ठाणे मार्गे मुंबई
