-
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. यावेळी त्यांचे चर्चेत येणे केवळ राजकीय भूमिकेमुळे नसून, त्यांनी स्वतः सर्वोच्च न्यायालयात उभे राहून आपली बाजू मांडण्याचा घेतलेला निर्णय हे त्यामागील प्रमुख कारण आहे.
-
आपल्या याचिकेवर स्वतः सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करणाऱ्या ममता बॅनर्जी या देशातील पहिल्या विद्यमान मुख्यमंत्री ठरल्या आहेत. त्यांच्या या धाडसी पावलामुळे भारतीय राजकारणात आणि न्यायव्यवस्थेत एक वेगळाच इतिहास रचला गेला आहे.
-
साध्या कुटुंबातून राजकारणापर्यंतचा प्रवास
ममता बॅनर्जी यांचा जन्म कोलकाता येथे एका बंगाली ब्राह्मण कुटुंबात झाला. वडील प्रमिलेश्वर बॅनर्जी आणि आई गायत्री देवी यांचे संस्कार त्यांच्या आयुष्यावर ठळकपणे दिसून येतात. साध्या पार्श्वभूमीतून आलेल्या ममतांनी लहान वयापासून संघर्षाचा सामना केला. -
लहान वयात आलेली जबाबदारी
वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी उपचाराअभावी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. या घटनेनंतर कुटुंबाची मोठी जबाबदारी ममता बॅनर्जी यांच्या खांद्यावर आली आणि याच काळात त्यांच्या जीवनातील संघर्ष अधिक तीव्र झाला. -
ममता बॅनर्जी यांचे शैक्षणिक योगदान
ममता बॅनर्जी यांची शैक्षणिक वाटचाल अत्यंत उल्लेखनीय ठरली आहे. त्यांनी इतिहास विषयात पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षण घेतले असून शिक्षणशास्त्रात पदवी मिळवली आहे. यासोबतच त्यांनी कायद्याचेही औपचारिक शिक्षण पूर्ण केले आहे. -
मतदार यादीबाबत गंभीर आरोप
मतदार यादी तपासणी प्रक्रियेदरम्यान नावाच्या स्पेलिंगमधील चूक, नावातील किरकोळ बदल किंवा आवश्यक कागदपत्रांच्या अभावामुळे अनेक खरे मतदार मताधिकारापासून वंचित राहू शकतात, असा गंभीर आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. -
सन २०२६ निवडणुकांबाबत भूमिका
सन २०२६ मध्ये होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका सन २०२५ मधील विद्यमान मतदार यादीच्या आधारेच घ्याव्यात, अशी स्पष्ट मागणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे, जेणेकरून लोकशाही हक्क सुरक्षित राहतील. -
देशभरात सुरू असलेली चर्चा
हा मुद्दा केवळ पश्चिम बंगालपुरता मर्यादित न राहता देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. मतदारांचे अधिकार, निवडणुकीची पारदर्शकता आणि निवडणूक यंत्रणेची भूमिका यावरून व्यापक चर्चा सुरू झाली आहे. -
ममता बॅनर्जींचे पाऊल का ठरते विशेष
एक विद्यमान मुख्यमंत्री स्वतः सर्वोच्च न्यायालयात उभे राहून घटनात्मक मुद्द्यावर युक्तिवाद करत असल्याने हा प्रसंग भारतीय राजकारणात अपवादात्मक मानला जात आहे. यामुळे ममता बॅनर्जी यांची कायदेशीर समज, आत्मविश्वास आणि राजकीय ठामपणा अधोरेखित होतो. (सर्व फोटो सौजन्य :PTI)
डायबिटीज होणार नाही, कॅन्सर जवळही येणार नाही; फक्त ‘हे’ आबंट फळ आठवड्यातून एकदा तरी खा