-
महाराष्ट्राच्या नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी आज, १० फेब्रुवारी रोजी मंत्रालयात आपल्या पदाचा अधिकृत कार्यभार स्वीकारला.
-
तत्पूर्वी, त्यांनी प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक (Shree Siddhivinayak Temple) मंदिरात जाऊन विधीवत पूजा केली.
-
“राज्यातील जनतेचे कल्याण आणि विकासाची कामे करण्यासाठी शक्ती मिळावी,” अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.
-
सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतर त्यांनी दादर येथील चैत्यभूमीला (Chaityabhoomi Dr. Babasaheb Ambedkar Smarak) भेट देऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले.
-
यावेळी त्यांनी महामानवाच्या समतावादी विचारांचे स्मरण करत जनसेवेचा संकल्प केला.
-
मंत्रालयात दाखल झाल्यावर त्यांनी सर्वप्रथम अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
-
पदभार स्वीकारताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते, आमदार आणि खासदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-
आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीलाही त्या उपस्थित राहणार असून, त्यानंतर त्या दिल्ली दौऱ्यावर रवाना होतील.
-
दिल्लीत त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची सदिच्छा भेट घेणार आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुनेत्रा पवार/इन्स्टाग्राम)
“आंदोलनात जाण्यापेक्षा मी घरीच राहून अभ्यास केला”, NEET परीक्षेत देशात दुसरा आलेल्या पानशुल बन्सलने CJP आंदोलनावर काय प्रतिक्रिया दिली?