-
सांगली: जिल्हा परिषदेमध्ये कोकरूड गटातून जनसुराज्य पक्षाच्या चिन्हावर साईतेजस्वी सत्यजित देशमुख निवडून गेल्या आहेत. त्यांच्या रुपाने शिराळा तालुक्यात प्रथमच जनसुराज्य पक्षाने थेट जिल्हा परिषदेच्या राजकारणात प्रवेश केला आहे. त्या आमदार सत्यजित देशमुख यांच्या कन्या आहेत.
-
रायगड: महाड–पोलादपूर मतदारसंघाचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचा जिल्हा परिषद निवडणुकीत विजय झाला आहे.
-
रायगड: अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या सुन अदिती दळवी यांचा अलिबाग मधील चेंढरे जिल्हा परिषद मतदार संघातून विजय झाला आहे. त्यांची प्रमुख लढत शेकापचा प्रविणा घासे यांच्यासोबत झाली होती.
-
जिल्हा परिषद निवडणुकीत इचलकरंजीचे भाजप आमदार राहुल आवाडे यांची कन्या सानिका आवाडे हिचा विजय झाला आहे. कोरोची जिल्हा परिषद गटातून त्यांचा विजय झाला आहे. सानिकाच्या विजयानंतर आवाडे कुटुंबाची चौथी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे.
-
सोलापूर: माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस गटातून धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलत बंधू राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील विजयी झाले आहेत.
-
रत्नागिरी: जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव यांचा विजय झाला आहे.
-
सोलापूर: माळशिरसचे माजी आमदार आणि भाजप नेते राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांचा जिल्हा परिषद निवडणुकीत विजय झाला आहे.
