-
सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांच्या लग्नाच्या चर्चा २०२६पासून सुरू होत्या. दोघांचा साखरपुडा २०२५मध्ये खाजगी समारंभात झाला होता. आता सचिन तेंडुलकर यांनी पोस्ट शेअर करत या विवाहाच्या चर्चांना दुजोरा दिला असून, लग्न लवकरच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
-
अर्जुन तेंडुलकर व सानिया चंडोक यांनी ऑगस्ट २०२५ मध्ये खाजगी सोहळ्यात साखरपुडा केला होता. दोन्ही कुटुंबीय व जवळचा मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला होता.
-
देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अर्जून तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांच्या विवाह सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.
-
अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी आपल्या विवाहसोहळ्याचे निमंत्रण पंतप्रधान मोदी यांना दिले.
-
अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांच्या लग्नसोहळ्यानिमित्त तेंडुलकर आणि चंडोक या दोन्ही कुटुंबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी सचिन तेंडुलकर यांनी पंतप्रधान मोदी यांना विवाहाचे निमंत्रण दिले.
-
सचिन तेंडुलकर यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेऊन मुलाच्या लग्नाचे निमंत्रण दिले.
-
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचीही तेंडुलकर आणि चंडोक कुटुंबांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांच्या विवाहाचे निमंत्रण दिले.
शुक्र ग्रहाची बदलतेय चाल; २६ मार्चपासून ‘या’ ३ राशींचा सुवर्णकाळ सुरु, नशीब रातोरात चमकेल, पैसा, प्रगतीचा वेग दुप्पट होणार