-
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी जेफ्री एपस्टीनला तीन-चार वेळा भेटल्याचे विधान केल्यानंतर, काँग्रेस खासदार आणि काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनी गुरुवारी त्यांचा राजीनामा मागितला.
-
इंडियन एक्सप्रेसशी बोलताना प्रियांका गांधी यांनी आरोप केला की, पुरी यांनी एपस्टीन यांच्याविरुद्धचे आरोप सार्वजनिक झाल्यानंतरही त्यांच्याशी पत्रव्यवहार केला होता.
-
जेफ्री एपस्टीनला २००८ मध्ये वेश्याव्यवसायाशी संबंधित गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवले होते. ज्यामध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचाही आरोप होता. नंतर २०१९ मध्ये फेडरल सेक्स ट्रॅफिकिंगच्या आरोपाखाली मॅनहॅटन तुरुंगात त्याचा मृत्यू झाला. सदर मृत्यू आत्महत्या म्हणून घोषित करण्यात आला होता.
-
३० जानेवारी रोजी अमेरिकेच्या न्याय विभागाने जारी केलेल्या कागदपत्रांच्या ताज्या भागातून असे दिसून आले आहे की, भाजपा नेते पुरी यांनी २०१४-१५ दरम्यान एपस्टीनशी ईमेलवरून संवाद साधला होता.
-
त्या कागदपत्रांचा संदर्भ देत प्रियंका गांधी यांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, त्यांच्या मते, केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा.
-
यापूर्वी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एपस्टीन फाइल्सच्या संदर्भात पुरी यांचे नाव घेतले होते. यानंतर मंत्र्यांनीही आपली प्रतिक्रिया दिली होती.
-
हरदीप पुरी यांनी आरोपांवर प्रत्युत्तर देताना म्हटले की, त्यांनी कोणताही गैरव्यवहार केला नाही. २००९ ते २०१३ पर्यंत संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून काम करताना आणि नंतर २०१७ पर्यंत आंतरराष्ट्रीय शांतता संस्थेच्या बहुपक्षीयतेवरील स्वतंत्र आयोगाबरोबर काम करताना ते आठ वर्षांत एपस्टीनला फक्त तीन किंवा चार वेळा भेटले होते.
-
पत्रकार परिषदेत पुरी यांनी सांगितले की, संदर्भ काही बैठकांपुरते मर्यादित होते आणि त्यांचे सर्व संवाद पूर्णपणे व्यावसायिक होते आणि बहुपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय कार्याशी संबंधित होते.
पैसाच पैसा, नवा फ्लॅट, गाडी मिळण्याचे संकेत! ३० एप्रिलपासून ‘या’ ३ राशींना मिळणार प्रचंड पैसा; बुध तब्बल ६ वेळा बदलणार चाल