-
नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (DGCA) एअरलाइन कंपन्यांच्या तिकीटांच्या रिफंडबाबतच्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे. त्यामुळे विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगलाच फायदा होणार आहे. (फोटो-pexels)
-
नवीन नियमांनुसार, आता प्रवासी काही अटी पाळून बुकिंगनंतर ४८ तासांच्या आत कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता तिकीट रद्द करू शकतात किंवा त्यात बदल करू शकतात.(फोटो-pexels)
-
DGCA ने नियमांत सुधारणा करताना स्पष्ट केले की, जर प्रवाशाने तिकीट थेट एअरलाइनच्या वेबसाइटवरून बुक केले असेल आणि बुकिंगच्या २४ तासांच्या आत त्यात काही चूक असल्याचे कळवले, तर त्याच व्यक्तीच्या नावात सुधारणा करण्यासाठी कंपन्यांनी कोणतेही अतिरिक्त शुल्क घेऊ नये. (फोटो-pexels)
-
जर तिकीट ट्रॅव्हल एजंट किंवा पोर्टलवरून खरेदी केले असेल, तरीही पैसे परत करण्याची जबाबदारी एअरलाइन कंपनीचीच असेल, कारण एजंट हे त्यांनीच नियुक्त केलेले प्रतिनिधी असतात.(फोटो-pexels)
-
तसेच एअरलाइन कंपन्यांना रिफंडची प्रक्रिया १४ कामकाजाच्या दिवसांच्या आत पूर्ण होईल, याची देखील काळजी घ्यावी लागणार आहे. (फोटो-pexels)
-
या नियमांमध्ये सुधरणा करण्याचे कारण म्हणजे, वेळेवर रिफंड न मिळाल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी वाढल्या होत्या, त्यामुळे सिव्हील एव्हिएशन रेग्युलेशन्समध्ये ही सुधारणा करण्यात आली आहे. हा सुधारित नियम २४ फेब्रुवारी रोजी लागू करण्यात आला आहे. (फोटो-pexels)
-
जुन्या नियमांनुसार, विमान तिकीट रद्द करताना किंवा त्यामध्ये बदल करताना कंपन्या त्यांच्या पॉलिसीनुसार कॅन्सलेशन चार्जेस लावत असत. ४८ तासांत मोफत कॅन्सलेशनता किंवा बदल करण्याचा कोणताही पर्याय पूर्वी उपलब्ध नव्हता. (फोटो-pexels)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…