-
अजित पवार यांच्या निधनानंतर मुलगा जय पवार यांचा पहिला वाढदिवस असून, पत्नी ऋतुजा पवार यांनी सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर केली आहे.
-
वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ऋतुजा यांनी ‘आज तुझा वाढदिवस आहे नवरा’, असे म्हणत जय पवार यांच्यासोबतचा एक सुंदर फोटो पोस्ट केला आहे.
-
अजित पवार यांच्या निधनाचे दुःख व्यक्त करताना ऋतुजा यांनी लिहिले, “हे सर्व अजूनही किती अविश्वसनीय वाटतेय; तू जी शक्ती आणि धीर दाखवला आहेस, त्याबद्दल मला तुझा सार्थ अभिमान वाटतो आणि तुझे कौतुकही वाटते. स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून, तू ज्या प्रकारे इतरांना सावरतोस आणि त्यांना मदत करतोस— ते पाहून जाणवते की, राज्याच्या कल्याणासाठी आणि लोकांच्या मदतीसाठी दादांचे (अजित पवार) वेळापत्रक कितीही व्यग्र असले तरी त्यांनी एका तत्त्वनिष्ठ, सभ्य आणि नि:स्वार्थी माणसाला घडवले आहे. असा अनुभव घेण्याचे भाग्य मला लाभले, हे माझे नशीब आहे. खूप प्रेम, तुझी बायको.”
-
गेल्या काही काळात जय पवार यांनी दाखवलेली हिंमत आणि शक्ती पाहून मला तुझा सार्थ अभिमान वाटतो, अशा शब्दांत त्यांनी पतीचे कौतुक केले.
-
स्वत:च्या गरजा बाजूला ठेवून इतरांना मदत करण्याच्या जय यांच्या स्वभावाचा उल्लेख ऋतुजा यांनी या पोस्टमध्ये आवर्जून केला आहे.
-
राज्याच्या कामात व्यग्र असूनही दादांनी (अजित पवार) एका तत्त्वनिष्ठ आणि सुसंस्कृत मुलाला घडवले आहे, असे ऋतुजा यांनी म्हटले.
-
वडिलांकडून मिळालेली सचोटी आणि नि:स्वार्थीपणाचा वारसा जय पवार समर्थपणे जपत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
-
या पोस्टसोबत ऋतुजा यांनी अजित पवार आणि जय पवार यांच्या बालपणातील एक जुना आणि आठवणीतील फोटोदेखील शेअर केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: ऋतुजा पवार /इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…