-
पार्थ पवार यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने वडील अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला.
-
२८ जानेवारी रोजी अजित पवार यांचे निधन झाल्यानंतरचा हा पहिलाच गुढीपाडवा असल्याने कुटुंब भावूक झाले आहे.
-
पार्थ यांनी सोशल मीडियावर कुटुंबासोबतचे आणि गुढीपाडव्याचे काही खास जुने फोटो शेअर केले आहेत.
-
“या गुढीपाडव्याला आम्ही दादांना प्रेमाने आणि कृतज्ञतेने स्मरतो. त्यांचे मार्गदर्शन आणि मूल्ये आजही आम्हाला दिशा दाखवत आहेत. नवीन वर्षाची सुरुवात त्यांच्या आशीर्वादाच्या छायेखाली करतो.” अशा शब्दांत पार्थ यांनी भावना व्यक्त केल्या.
-
नवीन वर्षाची सुरुवात वडिलांच्या आशीर्वादाच्या छायेखाली करत असल्याचे पार्थ यांनी नमूद केले.
-
या गुढीपाडव्याला आम्ही दादांचे प्रेमाने आणि कृतज्ञतेने स्मरण करत आहोत, असे पार्थ पवार म्हणाले.
-
पार्थ पवार यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
-
शेअर केलेल्या फोटोंमधून पवार कुटुंबातील सण-उत्सवाचा आणि जिव्हाळ्याचा काळ पाहायला मिळतोय.
-
(सर्व फोटो सौजन्य: पार्थ पवार/इन्स्टाग्राम)
शाळेत कराटे सरावादरम्यान मुलीच्या पोटात दुखापत…तातडीने रुग्णालयात नेऊन तपासणी अन् निदानानंतर बसला धक्का