-
मेळाव्यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मनसैनिक दाखल झाले होते. यावेळी बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील विविध विषयांवर भाष्य केलं.
-
एक दिवस महाराष्ट्राची सत्ता घेणार म्हणजे घेणारच, अशी गर्जना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरुन केली. हा माझा आत्मविश्वास असल्याचे देखील ठाकरे म्हणाले.
-
देशात आज धाकधूक असून भीषण परिस्थिती आहे. नेहमी नॉर्मलवर असणारे लोक सध्या गॅसवर आहेत. काही गोष्टी आपल्या पंतप्रधानांकडून राहून गेल्या.
-
जो इराण आपल्याला इतकी वर्ष साथ देत होता, त्या इराणवर ज्या प्रकारचे हल्ले होत आहेत, ते पाहता आपण इराणला साथ द्यायला हवी होती. इराण आपल्याला रुपयामध्ये तेल देत होता, आताचं माहित नाही. पण खामेनींचा मृत्यू झाल्यानंतरही निषेधाचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं नाही.
-
मी राजकारणात आलो जेव्हा पहिलं भाषण केलं, त्यावेळी मला बाळासाहेब ठाकरेंनी बोलवलं. एक एक वाक्य सांगितलं होतं ते स्क्रू फिट व्हावा तशी डोक्यात फिट झाली होती. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की काय बोलतोस ते महत्त्वाचं नाही, तू आज त्यांना काय दिलंस ते महत्त्वाचं आहे. समोरच्यांना विचार करायला काय दिलंस? माझ्यावर दडपण असतं की नवीन काय देऊ तुम्हाला? हे सरकार विचार करायला लागेल.
-
मी आज तुम्हाला नम्र विनंती करणार आहे, पहिल्यांदा मोबाइलच्या इन्स्टाग्राममधून बाहेर या. मध्यंतरी रिलबाज वगैरे आले होते. गुंतायला होतं त्यात. डान्सबार झाले त्याची लक्षणं आहेत तिथे
-
राज ठाकरे यांनी भाषणात महाराष्ट्रात होऊन गेलेल्या महापुरुषांची नावे आणि त्यांचा थोडक्यात परिचय करुन दिला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र घडवलेल्या महापुरुषांकडे जातीने पाहू नका, असे आवाहन केले.
-
मुख्यमंत्री सांगत आहेत विकास करायचा आहे, तीन ट्रिलियन अर्थव्यवस्था करायची आहे. पण महाराष्ट्रावर सध्या ११ लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे. ज्यावेळी पृथ्वीराज चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा राज्यावर २ लाख कोटींचं कर्ज होतं. २०१४ ते २०२६ या काळात हे सगळं ११ लाख कोटींचं कर्ज झालं.
-
फलोत्पादनात सर्वात मोठी क्रांती शरद पवार यांनी केली. ज्यांनी बारामतीमध्ये शेतीत ‘एआय’ तंत्रज्ञान आणलं आणि कशी प्रकारे क्रांती केली ते नक्कीच तिथे जाऊन नक्कीच बघितलं पाहिजे.
-
मी अनेकदा काही व्हिडीओ पाहतो, आपलेच मराठी लोक ओरडून सांगत असतात हिंदी मत बोलो, तू काय करतोय? तू हे त्याला हिंदीतच सांगतो. तामिळनाडू, आंध्र प्रदेश बघा, केरळ बघा, गुजरात बघा. प्रत्येक राज्य आपलं अस्तित्व टिकवून आहे, आपली भाषा टिकवून आहे. पण आमच्याकडचे आमदार, खासदार हे फक्त कंत्राटदार अन् पैसे एवढंच दररोज सुरू आहे. महाराष्ट्र विकायला काढलाय
-
ग्रामीण भागात विकास होत नाही, ग्रामीण भागातील आमचे तरुण-तरुणी शहरांत येतात. पण इथं शहरं बकाल पडलेली आहेत. अनेक शहरांत ड्रग्स विकलं जातंय. लहान-लहान मुलं आणि मुली पळवले जात आहेत. माझ्याकडे काही आकडेवारी आहे. गेल्या नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये फक्त मुंबईमध्ये ८२ मुलं बेपत्ता झाले. जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत नवी मुंबईत तब्बल ४९९ अपहरणाच्या घटनांची नोंद झाली
मुलगी मोठी झाली! प्रसिद्ध अभिनेत्रीने मुलीच्या ‘पहिल्या पाळी’निमित्त आयोजित केला सोहळा, पाहा Photos