-
महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली. अनेक मंत्री व राजकीय नेते या भोंदू बाबाचे भक्त आहेत. त्यात सर्वात पुढे होत्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर.
-
भोंदू बाबा अशोक खरात एका महिलेवर अघोरी अत्याचार करत असल्याची किळसवाणी व्हिडीओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची धग वाढू लागली.
-
दरम्यान भोंदू खरातचे कारनामे अहिल्यानगरमधील एका दैनिकाने मागच्या वर्षीच उघड करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र रूपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत आपल्याला त्रास दिल्याचा दावा संबंधित दैनिकाच्या संपादकांनी केला आहे.
-
यामुळे रूपाली चाकणकर यांना या प्रकरणात ओढले जाऊ लागले. तसेच त्यांनी राजीनामा द्यावा, असा दबाव वाढू लागला. यात त्यांच्याच पक्षाचे नेतेही चाकणकर यांच्यावर टीका करू लागले होते.
-
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये रूपाली चाकणकर या भोंदू बाबा खरातला एका कार्यक्रमात केक भरवताना दिसत आहेत.
-
रूपाली चाकणकर यांनी म्हटले की, देवस्थानाच्या निमित्ताने खरात यांच्याशी संबंध आला होता. मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही. मात्र खरात यांच्याशी जुनी ओळख असल्याचे समोर आलेल्या फोटोंवरून दिसत आहे.
-
भोंदू बाबा खरातसाठी पावसात छत्री पकडून उभ्या राहिल्याचा रूपाली चाकणकर यांचा फोटो बराच व्हायरल झाला. या फोटोवरून विरोधकांनी खरात यांच्यावर महिला आयोगाचे छत्र असल्याची टीका केली.
-
रूपाली चाकणकर भोंदू बाबा कॅप्टन खरातचे पाद्यपूजन करत असल्याचाही एक व्हिडीओ समोर आला होता. यावरूनही त्यांना लक्ष्य करण्यात आले.
-
भोंदूबाबा खरातच्या सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील ‘श्री शिवानिका संस्थान’च्या कार्यकारी मंडळात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचाही समावेश आहे. त्यावरूनही त्यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली.
Uday Kotak: “मोठ्या धक्क्यासाठी तयार राहा, वेळ कमी आहे!”; कोटक महिंद्रा बँकेच्या संस्थापकांनी दिला इशारा