-
आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत शेकडो चिन्हे पाहतो. स्मार्टफोनवरचे ब्लूटूथ असो वा लॅपटॉपचे पॉवर बटन; ही चिन्हे आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनली आहेत. परंतु, ही चिन्हे केवळ नक्षी नसून त्यांच्यामागे हजारो वर्षांचा इतिहास, प्राचीन संस्कृती आणि विज्ञानाचे गुपित दडलेले आहे.
-
USB: समुद्रदेवतेचा त्रिशूळ
USB चे चिन्ह समुद्रदेवता नेपच्यूनच्या ‘त्रिशूळा’पासून प्रेरित आहे. या चिन्हाच्या टोकाला असलेले त्रिकोण, वर्तुळ आणि चौरस हे दर्शवतात की हे तंत्रज्ञान विविध प्रकारची उपकरणे एकाच जागी जोडण्याची क्षमता ठेवते. -
पॉवर बटण: बायनरी भाषेचा संगम
पॉवर बटणाचे चिन्ह जागतिक स्तरावर सारखेच असते. हे चिन्ह बायनरी कोडिंगमधून आले आहे. गणितातील ‘1’ म्हणजे चालू (ON) आणि ‘0’ म्हणजे बंद (OFF). या दोन्ही आकड्यांना एकत्र गुंफून हे बटण तयार करण्यात आले, जेणेकरून भाषेची अडचण न येता जगाला ते समजावे. -
हॅशटॅग (#): ऑक्टोथॉर्पचे रहस्य
सोशल मीडियावर गाजणाऱ्या हॅशटॅगचे मूळ नाव ‘ऑक्टोथॉर्प’ (Octothorpe) आहे. बेल लॅब्सच्या अभियंत्यांनी १९६० च्या दशकात टेलिफोन कीपॅडसाठी हे चिन्ह निवडले. ‘ऑक्टो’ म्हणजे ८ बिंदू, तर ‘थॉर्प’ हे नाव अभियंत्यांनी गमतीने ठेवले होते. -
RX चिन्ह: औषधाची रेसिपी
डॉक्टरांच्या चिठ्ठीवरील ‘RX’ हे ‘Recipe’ या लॅटिन शब्दाचे संक्षिप्त रूप आहे, ज्याचा अर्थ ‘घेणे’ असा होतो. १६ व्या शतकापासून औषधोपचारासाठी हे चिन्ह वापरले जाते. काही जण याला प्राचीन ग्रीक देवतांच्या डोळ्याचे प्रतीकही मानतात. -
@ चिन्ह: लॅटिन भाषेचा वारसा
आज ईमेलसाठी अनिवार्य असलेले ‘@’ चिन्ह मध्ययुगीन काळात रुजलेले आहे. असे मानले जाते की, मध्ययुगीन भिक्षूंनी ‘ad’ या लॅटिन शब्दासाठी (ज्याचा अर्थ ‘कडे’ किंवा ‘प्रती’ असा होतो) वेळ वाचवण्यासाठी ‘a’ आणि ‘d’ ला एकत्र करून हे संक्षिप्त रूप तयार केले. -
ब्लूटूथ (Bluetooth): एका राजाची कहाणी
ब्लूटूथचा लोगो हा प्राचीन नॉर्डिक रून्सपासून (Nordic Runes) तयार झाला आहे. तो ‘H’ आणि ‘B’ या अक्षरांच्या संयोगाने बनला आहे. हे ‘हॅराल्ड ब्लूटूथ’ (Harald Bluetooth) या १० व्या शतकातील डेन्मार्क आणि नॉर्वेच्या राजाच्या नावाचे आद्याक्षर आहे. ज्याप्रमाणे राजा हॅराल्डने विखुरलेल्या जमातींना एकत्र आणले, त्याचप्रमाणे हे तंत्रज्ञान विविध उपकरणांना एकत्र जोडते.
April Horoscope: आता गरिबीचे दिवस संपतील! एप्रिलमध्ये ‘या’ राशींना मिळणार प्रचंड पैसा आणि सोनं; राजयोगाने तिजोरीत, बँकेत वाढेल धनसंपत्ती…