-
झी २४ तास या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या आवडी-निवडीवर भाष्य केले.
-
रश्मी ठाकरे यांच्या हातचे साबुदाणे वडे देवेंद्र फडणवीस यांना खूप आवडतात का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.
-
या प्रश्नावर उत्तर देताना ही बातमी अगदी खरी असल्याचे अमृता फडणवीस यांनी स्पष्ट केले.
-
जेव्हा खाण्याची गोष्ट समोर येते, तेव्हा देवेंद्रजी सर्व प्रकारचे राजकीय दुरावे विसरतात, असे त्या म्हणाल्या.
-
चविष्ट पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस कोणाकडेही जाऊन खाऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले.
-
देवेंद्रजी साबुदाणे वडे खायला गेले, तर त्यांच्यामागोमाग मीसुद्धा तिथे जाऊ शकते, असे अमृता फडणवीस यांनी मिश्कीलपणे सांगितले.
-
निमंत्रणाची वाट पाहणार का, या प्रश्नावर बोलताना, आमचे रश्मीवहिनींशी अतिशय चांगले संबंध असल्याचे त्यांनी सांगितले.
-
आमच्यामध्ये असा कोणताही इशू किंवा वाद नाही, असेही त्यांनी यावेळी आवर्जून स्पष्ट केले.
-
साबुदाणे वडे खावेसे वाटले, तर मी कधीही तिथे जाऊन खाऊन येऊ शकते, असे अमृता फडणवीस यांनी स्पष्ट केले.
Donald Trump Protests No Kings : “विदुषका, राजमुकुट खाली ठेव”, डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात जगभर संताप वाढला, अमेरिका आणि युरोपीय देशांत ‘नो किंग्स’ मोहिम