-
चलनाची ऐतिहासिक घसरण
इराणच्या रियालची खरेदी शक्ती पूर्णपणे संपुष्टात आली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, इराणच्या १ कोटी रियालची भारतीय चलनात किंमत आता फक्त ₹७१३ उरली आहे. अवघ्या काही महिन्यांत रुपयाच्या तुलनेत रियाल कित्येक पटीने स्वस्त झाला आहे. -
डॉलरसमोर रियाल हतबल
आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत इराणची स्थिती भयावह आहे. भारतात १ डॉलरची किंमत ₹९३.८३ असताना, इराणमध्ये एका डॉलरसाठी १३,१५,०५० रियाल मोजावे लागत आहेत. यामुळे आयात होणाऱ्या वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. -
युद्धाचा भीषण तडाखा
२८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमुळे इराणच्या अर्थव्यवस्थेची कंबर मोडली. पायाभूत सुविधांचे झालेले नुकसान आणि बँकिंग प्रणालीवर झालेला परिणाम यामुळे देशात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. -
सायबर हल्ल्याने डिजिटल पेमेंट ठप्प
११ मार्च रोजी इराणच्या प्रमुख ‘बँक सेपा’ (Bank Sepah) च्या डेटा सेंटरवर मोठा सायबर हल्ला झाला. यामुळे देशातील डिजिटल पेमेंट यंत्रणा कोलमडली असून नागरिकांना आर्थिक व्यवहारांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. -
महागाईचा उच्चांक (१०५%)
रियालच्या घसरणीचा थेट फटका सर्वसामान्यांच्या ताटावर बसला आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये ६४% असलेली अन्नधान्य महागाई फेब्रुवारी २०२६ पर्यंत १०५% वर पोहोचली आहे. जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. -
बँकिंग क्षेत्रातील ‘पोन्झी स्कीम’
इराणची बँकिंग व्यवस्था भ्रष्टाचाराने पोखरली गेली आहे. Ayandeh Bank सारख्या मोठ्या बँकांचे पतन झाले असून तज्ज्ञांच्या मते, इराणमधील बँका प्रत्यक्ष मालमत्तेऐवजी केवळ कागदी नफ्यावर चालणाऱ्या ‘पोन्झी स्कीम’सारख्या झाल्या आहेत. -
रोख रकमेची तीव्र टंचाई
देशात नोटांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. नागरिकांना बँकेतून दररोज फक्त $१८ ते $३० (सुमारे ₹१६०० ते ₹२८००) इतकीच रक्कम काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे बँकांबाहेर लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत -
सर्वसामान्यांची हतबलता
चलनाच्या घसरणीमुळे लोकांच्या आयुष्यभराच्या बचतीचे मूल्य शून्य झाले आहे. भविष्याबद्दलची अनिश्चितता आणि वाढत्या महागाईमुळे इराणमधील नागरिक मोठ्या आर्थिक विवंचनेत अडकले आहेत.
Dubai Abu Dhabi War Threat: Jeffrey Sachs Warns UAE Over Iran Conflict : ‘दुबई आणि अबू धाबी उद्ध्वस्त होतील’, अमेरिकन अर्थतज्ज्ञाचा UAE ला गंभीर इशारा; इराण युद्धावरून मोठे विधान