-
अचानक हवामान बदल
मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यात कडाक्याचे ऊन पडत असताना सोमवारी दुपारी अचानक हवामानात बदल झाला आणि पावसाने हजेरी लावली. -
पुण्यात पावसाचे पाणी तुंबल्याने नागरिकांना रस्त्यांवरून चालताही येत नव्हते.
-
सोमवारी दुपारी जवळपास तासभर पुणे शहराला पावसाने झोडपले.
-
वेळ आणि तीव्रता
दुपारी तीनच्या सुमारास सोसाट्याचा वारा, ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोरदार तडाखा बसला. -
सोमवारी दुपारी झालेल्या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी ट्रॅफिक जॅम झाले होते.
-
अचानक आलेल्या पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रस्त्यावरील सिग्नल यंत्रणा विस्कळीत झाली, परिणामी शहरातील मुख्य चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.
-
बाणेर, बालेवाडी आणि पाषाण परिसरात पावसासोबत गारा पडल्या. गारांमुळे रस्त्यांवर काही काळ पांढरी चादर पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले.
-
शहराच्या मध्यवर्ती पेठ परिसरासह शिवाजीनगर, डेक्कन, स्वारगेट, औंध आणि पुणे विद्यापीठ परिसरात पावसाचा जोर सर्वाधिक होता.
-
गेल्या काही दिवसांपासून पुणेकर वाढत्या उकाड्याने हैराण झाले होते; मात्र या पावसामुळे तापमानात घट होऊन हवेत सुखद गारवा निर्माण झाला आहे.
-
वाऱ्याच्या वेगामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या छोट्या फांद्या तुटून पडल्या. तसेच, रस्त्यावरील फेरीवाले आणि दुचाकीस्वारांची मोठी तारांबळ उडाली व त्यांचे आर्थिक नुकसान झाले
-
पुणे शहरात गारांसह जोरदार पाऊस झाला. घरातील कुंड्यातही गारा पडल्याचे दिसत आहे.
-
पावसापासून वाचण्यासाठी टोपीचा वापर
-
सोमवारी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या.
-
जोराच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या रस्त्यावर पडलेल्या दिसत आहेत.