-
२८ जानेवारीच्या सकाळी अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आणि राष्ट्रवादी पक्षावर दुःखाचा डोंगर कोसळला.
-
अजित पवार यांच्या निधनाला दोन महिने पूर्ण झाले आहेत. ‘एबीपी माझा’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत अजित दादा गेल्यानंतरची सर्वात मोठी आव्हाने कोणती? असा प्रश्न सुनील तटकरे यांना विचरण्यात आला.
-
या मुलाखतीत तटकरे म्हणाले की, दादांच्या निधनानंतर सर्वात मोठे आव्हान स्वतःच्या मनाला सावरणे हे होते.
-
दादांनी जो अढळ निश्चय आमच्यात पेरला होता तो पुढे चालू ठेवणे असे त्यांनी नमूद केले.
-
“दादांच्या नंतर काय?” हा मोठा प्रश्न समोर असताना सुनेत्रा वहिनीच हा पदभार सांभाळू शकतात, असे आम्हा सर्व सहकाऱ्यांना वाटले.
-
सुनेत्रा वहिनींची दादांशी दीर्घकाळाची साथ असल्याने त्यांच्या नावाची पक्षात चर्चा होती.
-
विधिमंडळात नवीन नेता निवडणे आणि शपथविधीची प्रक्रिया पूर्ण करणे हे आमच्यासमोरचे सर्वात मोठे आव्हान होते.
-
मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळवून ही सर्व प्रक्रिया आम्ही अत्यंत तातडीने पूर्ण केली, असे तटकरे यांनी सांगितले.
-
मी एकट्यानेच नाही; प्रफुल पटेल, छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांच्यासह आम्ही सर्वांनी मिळून ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
-
२०२३ मध्ये जेव्हा एनडीएमध्ये (NDA) सहभागी होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा आम्ही सर्वजण त्या प्रक्रियेचा भाग होतो, त्यामुळे स्वाभाविकपणे आमची ती सर्वांची जबाबदारी होती, ती आम्ही पार पाडली, असे सुनील तटकरे यांनी सांगितले.
Video: मीनाक्षी शेषाद्रींनी ३८ वर्षांपूर्वीच्या स्वत:च्याच गाण्यावर केला डान्स; अमिताभ बच्चन यांच्याबरोबर केलेले काम