-
आम आदमी पार्टीने राघव चढ्ढा यांना राज्यसभेतील उपनेते पदावरून हटवले आहे.
-
या निर्णयानंतर राघव चढ्ढा यांच्या राजकीय प्रवासासोबतच त्यांच्या संपत्तीचीही मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.
-
राघव चढ्ढा यांची एकूण संपत्ती साधारण ५० लाख रुपयांच्या आसपास असल्याची माहिती मिळतेय.
-
त्यांच्या तुलनेत पत्नी परिणीती चोप्रा यांची संपत्ती तब्बल ७४ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.
-
राघव चढ्ढा यांच्याकडे साधारण ३६ लाख रुपयांचे एक घर आणि मारुती सुझुकी कार असल्याची चर्चा आहे.
-
परिणीती चोप्रा यांच्याकडे मुंबईतील वांद्रे भागात २२ कोटी रुपयांचे आलिशान घर असल्याचे समजते.
-
राघव यांच्याकडे पाच लाखांचे सोने आणि सहा लाखांचे समभाग असून, दोघांच्या मालमत्तेत मोठी तफावत दिसून येतेय.
-
परिणीती यांच्या ताफ्यात अनेक महागड्या गाड्या असून, त्यांची वार्षिक कमाईदेखील कोट्यवधींच्या घरात असल्याचे मानले जाते.
-
दोघांची एकत्रित संपत्ती सुमारे साडेचौऱ्याहत्तर कोटींच्या घरात असून, त्यात पत्नीचा वाटा मोठा असल्याचे दिसते.
-
(सर्व फोटो सौजन्य: राघव चढ्ढा/इन्स्टाग्राम)
शिंदे गटाचे २५ आमदार भाजपात जाण्याच्या तयारीत? शिवसेनेच्या प्रमुख नेत्याची पक्षातून हकालपट्टी; वाचा ५ घडामोडी…