-
आसाम पोलिसांच्या गुन्हे शाखेने नोंदवलेल्या एका गुन्ह्याच्या संदर्भात, दिल्ली पोलिसांच्या मदतीने आसाम पोलिसांचे एक पथक मंगळवारी नवी दिल्लीतील काँग्रेस नेते पवन खेरा यांच्या निवासस्थानी पोहोचले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
-
खेरा यांनी एका पत्रकार परिषदेत, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नी रिनिकी भुयान यांच्याकडे तीन पासपोर्ट असून त्यांच्याकडे अघोषित परदेशी मालमत्ता असल्याचा आरोप केल्यानंतर दोन दिवसांनी ही घडामोड समोर आली आहे.
-
खेरा यांनी काही कागदपत्रांचे फोटोदेखील शेअर केले होते , ज्यांमध्ये कथितरित्या यूएईमधील भुयान यांच्या नावावरील मालमत्ता आणि अमेरिकेतील वायोमिंग येथे नोंदणीकृत एक कंपनी दिसत होती. त्यांच्या दाव्यानुसार, या गोष्टी शर्मा यांच्या प्रतिज्ञापत्रात उघड केल्या गेल्या नव्हत्या.
-
या आरोपांनंतर, रिनिकी भुयान यांनी खेरा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली, ज्यामुळे आसाम पोलीस गुन्हे शाखेने बनावटगिरी आणि संबंधित आरोपांखाली गुन्हा दाखल केला, अशी माहिती डीसीपी क्राईम देबजित नाथ यांनी दिली.
-
या प्रकरणाच्या संदर्भात अधिकाऱ्यांनी शोधमोहीम राबवली, त्यावेळी खेरा त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी उपस्थित नव्हते.
-
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले की, खेरा यापूर्वी गुवाहाटीहून निघाले होते आणि ते हैदराबादला गेले असावेत असा विश्वास आहे. या प्रकरणात कायदा त्याचे काम करेल, असेही ते म्हणाले.
-
या आरोपांना उत्तर देताना, रिनिकी भुयान म्हणाल्या की, खेरा यांनी प्रसारित केलेली त्यांच्या कथित पासपोर्टची छायाचित्रे एआय-निर्मित आणि एडिट केलेली होती, तसेच त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला बदनाम करण्याचा हा एक प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला.
-
खेरा यांच्या जवळच्या एका काँग्रेस नेत्याने असा दावा केला की, त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी आरोप केला की, या प्रकरणाची चौकशी करण्याऐवजी पोलीस कारवाई केली जात आहे; तसेच या कारवाईवेळी खेरा दिल्लीत नव्हते, असेही त्यांनी नमूद केले.
Trump Iran Nuclear Threat: ट्रम्प इराणच्या विरोधात अणुबॉम्बचा वापर करणार? जेडी व्हान्स यांच्या ‘त्या’ विधानामुळं खळबळ; तर White House ने म्हटले…