-
इस्रायलने लेबनॉनवर बुधवारी (०८ एप्रिल) हवाई हल्ले केले. यात ८९ नागरिकांचा मृत्यू झाला तर ७०० जण जखमी झाले. (फोटो – X/ United Nations)
-
इराणविरुद्ध शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर काही वेळातच इस्रायलने लेबनॉनवर हवाई हल्ले केले. (फोटो – X/ United Nations)
-
हिजबुल्लाहने इराणच्या समर्थनात इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केल्यानंतर इस्रायलने लेबनॉनकडे मोर्चा वळवला होता. (फोटो – X/ United Nations)
-
दरम्यान, पाकिस्तानने शस्त्रसंधीच्या करारात लेबनॉनचाही समावेश असल्याचे म्हटले आहे. पण इस्रायलने हा दावा फेटाळून लावला आहे. (फोटो – X/ United Nations)
-
इस्रायलने हिजबुल्लाच्या १०० हून अधिक तळांवर हल्ला केल्याचा दावा केला आहे. (फोटो – X/ United Nations)
-
इस्रायलने केलेल्या हल्ल्यात लेबनॉनमध्ये अनेक इमारती उदध्वस्त झाल्या आहेत. अनेकजण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. (फोटो – X/ @sahar_ghaddar)
-
मार्चच्या सुरुवातीला इस्रायलने लेबनॉनविरुद्ध लष्करी कारवाईला सुरुवात केली असून, आत्तापर्यंत १,५०० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. (फोटो – X/ @sahar_ghaddar)
-
या संघर्षामुळे १२ लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. हल्ला झालेल्या भागांमध्ये हिजबुल्लाहचा प्रभाव असल्याचेही सांगितले जाते. (फोटो – X/ @sahar_ghaddar)