-
प्राचार्याला धमकी देऊन सात लाख रुपयांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी सोनाली हिंगेंसह आणखी दोघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (फोटो – Instagram/ Sonali Hinge Patil)
-
सोनाली हिंगेंसह, अजित बडे (पोलिस उपनिरीक्षक), सुदाम तायडे यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (फोटो – Instagram/ Sonali Hinge Patil)
-
पुणे पोलिसांत दामिनी मार्शल म्हणून कार्यरत असणाऱ्या सोनारी हिंगे या प्रसिद्ध रिल स्टार देखील आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी केलेल्या प्रयत्नांसाठी त्यांना ओळखले जाते. (फोटो – Instagram/ Sonali Hinge Patil)
-
पुण्यातील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या प्राचार्यांना पॉक्सो कायद्याची भीती दाखवून ब्लॅकमेल केल्याची हिंगे यांच्यासह इतर संशयितांवर आरोप आहे. (फोटो – Instagram/ Sonali Hinge Patil)
-
प्रकरण दाबण्यासाठी तिघांना प्रचार्यांवर दबाव निर्माण करुन सात लाख रुपये उकळले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. (फोटो – Instagram/ Sonali Hinge Patil)
-
दरम्यान, प्राचार्यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला. (फोटो – Instagram/ Sonali Hinge Patil)
-
पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन योग्य कारवाईचे आदेश दिले आहेत. (फोटो – Instagram/ Sonali Hinge Patil)
-
सोनाली हिंगे यांनी एम. कॉम, एम,फिलपर्यंत शिक्षण घेतले आहे. गेल्या १२ वर्षापासून त्या पोलिस दलात कार्यरत आहेत. (फोटो – Instagram/ Sonali Hinge Patil)
सावंतवाडी अन् दोडामार्ग तालुक्यात ‘किंग कोब्रा’चे दर्शन; निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण