-
अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार रिंगणात उतरल्या आहेत.
-
बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराची सांगता सभा मंगळवारी शारदा प्रांगणात उत्साहात पार पडली, यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी जय पवार यांनी मतदारांशी संवाद साधला.
-
सभेत बोलताना जय पवार भावूक झाले आणि त्यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, दादा कितीही कामाच्या व्यापात असले तरी रात्री फोन करून दौऱ्याची विचारपूस करायचे.
-
‘काय रे जय, कसा झाला दौरा? कोणत्या गावात काय आडचण आली?’ असा प्रश्न दादा रात्री फोनवर विचारायचे, असे जय पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले.
-
कोणत्या गावात कोणती कामे तातडीने करण्याची गरज आहे, याची काळजी दादांना असायची आणि तोच आवाज आज आपल्या सर्वांच्या हृदयात आणि मनात कायम आहे असे ते म्हणाले.
-
वडिलांच्या शिकवणीची आठवण सांगताना जय पवार म्हणाले की, दादांचा आवाज आजही माझ्या मनात घुमतोय, ते नेहमी म्हणायचे, ‘जयड्या, रडायचं नाही, लढायचं.’
-
‘तुम्ही रात्रांदिवस काम करता, थोडा वेळ कुटुंबालाही द्या’ असे मी शाळेत असताना त्यांना सांगायचो. मात्र, तेव्हा मला त्यांच्या कामाची व्याप्ती पूर्णपणे समजली नव्हती.
-
पूर्ण बारामती आणि महाराष्ट्र हेच माझे कुटुंब आहे, असे उत्तर दादांनी मला दिले होते आणि आज जाता जाता वहिनींना पहिली महिला उपमुख्यमंत्री करून त्यांनी इतिहास घडवला आहे.
-
दादांनी कधीही जातीपातीचे राजकारण न करता सर्वांना एकत्र घेऊन काम केले; ही निवडणूक बिनविरोध झाली असती तर तीच त्यांना खरी आदरांजली ठरली असती, असे मत जय पवार यांनी व्यक्त केले. (सर्व फोटो साभार- जय पवार इन्स्टाग्राम)
१ नंबर! विद्यार्थ्यांसह शिक्षिकेने धरला ठेका, ‘मुकाबला’वर केला जबरदस्त डान्स; पाहा VIDEO