-
राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांच्यासह अन्य सहा सदस्यांच्या बाहेर पडण्यामुळे वरिष्ठ सभागृहातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून, सत्ताधारी भाजपाची ताकद वाढली आहे.
-
या मोठ्या राजकीय भूकंपामुळे आम आदमी पक्षाचे अस्तित्व धोक्यात आले असून, पक्षाचे संख्याबळ १० वरून थेट ३ वर घसरले आहे.
-
दुसरीकडे फुटलेल्या खासदारांच्या विलीनीकरणामुळे भाजपाचे संख्याबळ १०६ वरून आता ११३ वर पोहोचले असून, सभागृहात त्यांची पकड अधिक मजबूत झाली आहे.
-
या फुटीचा फटका संपूर्ण विरोधी पक्षांच्या गटालाही बसला असून, त्यांचे एकूण संख्याबळ ८४ वरून ७७ पर्यंत खाली आले आहे.
-
राघव चड्ढा, संदीप पाठक, अशोक मित्तल, स्वाती मालीवाल, हरभजन सिंग, राजिंदर गुप्ता व विक्रम साहनी या सात खासदारांनी भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
-
आपल्या निर्णयाचे समर्थन करताना राघव चड्ढा यांनी आम आदमी पक्षावर गंभीर आरोप केले असून, पक्ष आता तत्त्वांपासून भरकटल्याचे म्हटले आहे.
-
देशहिताऐवजी केवळ वैयक्तिक फायद्यासाठी पक्ष काम करीत असल्याची टीका करीत त्यांनी दोन-तृतीयांश बहुमतासह भाजपामध्ये विलीन होण्याचा निर्णय जाहीर केला.
-
या पडझडीनंतर आता ‘आप’कडे केवळ संजय सिंह, एन. डी. गुप्ता व बलबीर सिंह सीचेवाल हे तीनच खासदार शिल्लक राहिले आहेत.
-
काँग्रेस (२९), तृणमूल काँग्रेस (१३) व द्रमुक (८) यांच्या नेतृत्वाखालील विरोधी गटाची ताकद आता ७७ पर्यंत मर्यादित राहिली आहे.
Kalyan Dombivli Rickshaw: युपी, बिहारमधून काल आले आणि आज कल्याण डोंबिवलीत रिक्षा चालवायला लागले; परप्रांतीयांना शासकीय दाखले मिळणे सोपे