-
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या मिसिंग लिंक प्रकल्पाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पाहणी केली. (फोटो – X/ Eknath Shinde)
-
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम आता पूर्ण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. (फोटो – X/ Eknath Shinde)
-
खासदार श्रीरंग बारणे, माजी नगरसेवक आबासाहेब बागुल, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांच्यासह अधिकाऱ्यांच्या उपस्थित शिंदे यांनी मिसिंग लिंकची पाहणी केली. (फोटो – X/ Eknath Shinde)
-
मिसिंग लिंक प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे. (फोटो – X/ Eknath Shinde)
-
घाटातील वाहतूक कोंडीतून मुक्तता होऊन जलद दळणवळणामुळे अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. (फोटो – X/ Eknath Shinde)
-
१०.५ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात दोन भव्य बोगदे, उंच व्हायाडक्ट आणि टायगर व्हॅलीवरील सुमारे १८२ मीटर उंच केबल-स्टेड पूल उभारण्यात आला आहे. (फोटो – X/ Eknath Shinde)
-
सुमारे २३.७५ मीटर रुंद बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक मानला जातो. (फोटो – X/ Eknath Shinde)
-
७० किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे, मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीत हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला आहे. (फोटो – X/ Eknath Shinde)
-
लोणावळा तलावाच्या १८२ मीटर खालून हा रस्ता जाणार आहे, हा प्रकल्प पूर्ण करणे म्हणजे एक आव्हान होते, मात्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हे मोठे आव्हान स्वीकारून प्रकल्प पूर्णत्वास नेल्याचे सांगत त्यांचे विशेष कौतुक केले. (फोटो – X/ Eknath Shinde)
-
मिसिंग लिंक प्रकल्प सुरू झाल्यानंतर टोलमध्ये कोणतीही वाढ होणार नाही. चारचाकी वाहने आणि बसेस यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे यावेळी बोलताना स्पष्ट केले. (फोटो – X/ Eknath Shinde)
अभ्यासात खूप हुशार असतात ‘या’ मूलांकाचे लोक, गुरुच्या आशीर्वादाने होतात करिअरमध्ये यशस्वी