-
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनाला आज (२८ एप्रिल) तीन महिने पूर्ण झाले आहेत.
-
या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी बारामती येथील विद्या प्रतिष्ठान परिसरातील स्मृतीस्थळी जाऊन अजित पवार यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.
-
यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना युगेंद्र पवार भावूक झाले. ते म्हणाले, “अजित काका, तुम्ही पाहिलेली स्वप्ने पुर्ण करण्यासाठी आम्ही सदैव काम करत राहू. तुमची शिकवण आणि संस्कार घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करू.”
-
अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघाचे १९९५ ते २०२४ या प्रदीर्घ कालावधीत सलग आठ वेळा प्रतिनिधित्व केले होते.
-
आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी सहकार, कृषी, क्रीडा, वित्त, आणि उत्पादन शुल्क यांसारखी महत्त्वाची खाती अत्यंत समर्थपणे सांभाळली.
-
प्रशासकीय पकड आणि कामाचा उरक ही त्यांची विशेष ओळख होती.
-
त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर आणि जबाबदारीवर सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री तथा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : युगेंद्र पवार/इन्स्टाग्राम)
Robert Kiyosaki: “आता पैशाच्या इतिहासातील सर्वात कठीण काळ सुरू होतोय!”; ‘रिच डॅड पुअर डॅड’च्या रॉबर्ट कियोसाकींचे भाकीत