-
Maharashtra Day 2026: महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आज बीड येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ उत्साहात संपन्न झाला.
-
यावेळी त्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
-
ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, “१ मे हा दिवस महाराष्ट्राच्या देदीप्यमान इतिहासाचा आणि कष्टकरी कामगारांच्या श्रमाचा गौरव करणारा दुहेरी अभिमानाचा सोहळा आहे.”
-
“संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, त्यांच्या त्यागामुळेच आज आपल्याला हा सन्मानाचा दिवस पाहायला मिळत आहे.”
-
महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि विकासासाठी शासन कटिबद्ध असून, जनसेवेचा वारसा अधिक सक्षमपणे पुढे नेण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. “हा दिवस केवळ राज्य स्थापनेचा उत्सव नसून, तो आपला स्वाभिमान, एकजूट आणि सांस्कृतिक वैभव जोपासण्याचा सण आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
-
कामगार दिनाचे औचित्य साधत त्यांनी राज्यातील कष्टकरी वर्गाचे आभार मानले.
-
आपल्या घामातून आणि कष्टांतून महाराष्ट्राच्या विकासाची इमारत उभी करणाऱ्या प्रत्येक कामगाराचा सन्मान करणे, ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
-
(सर्व फोटो सौजन्य : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार/इन्स्टाग्राम)
अभ्यासात खूप हुशार असतात ‘या’ मूलांकाचे लोक, गुरुच्या आशीर्वादाने होतात करिअरमध्ये यशस्वी