-
पश्चिम बंगालमध्ये तीन वेळा मुख्यमंत्री हे पद भूषवणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या संपत्तीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
-
सोशल मीडियावरील माहितीनुसार, २०११ पासून राज्याची सत्ता हाती असलेल्या ममता बॅनर्जी यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात १५.४ लाख रुपयांची संपत्ती जाहीर केली असल्याचे म्हटले जाते.
-
असे सांगितले जाते की, अनेक दशके राजकारणात सक्रिय असूनही त्यांच्याकडे स्वतःचे घर, जमीन किंवा कोणतीही खासगी गाडी नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
-
सोशल मीडियावरील दाव्यांनुसार, त्यांच्या बँक खात्यात एकूण १२.७६ लाख रुपये जमा असून, त्यांच्याकडे केवळ ९.७५ ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत.
-
निवडणूक प्रतिज्ञापत्राचा दाखला देत सोशल मीडियावर असे म्हटले जातेय की, ममता बॅनर्जी या देशातील सर्वांत कमी संपत्ती असलेल्या मुख्यमंत्र्यांपैकी एक आहेत.
-
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या उत्पन्नातील चढ-उतारांबाबतही चर्चा केली जात असून, २०२४-२५ मध्ये त्यांचे उत्पन्न २३.२१ लाख रुपये असल्याचे समोर आले आहे.
-
१९९८ मध्ये स्वतःचा पक्ष स्थापन करणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्याकडे असलेल्या मर्यादित मालमत्तेबाबत इंटरनेटवर प्रतिक्रिया उमटत आहेत.
-
एडीआरच्या अहवालाचा संदर्भ देत नेटिझन्स असा दावा करत आहेत की, ममता बॅनर्जी यांची नेट वर्थ इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत सर्वांत कमी आहे.
-
थोडक्यात सांगायचे तर, सत्तेत दीर्घकाळ राहूनही त्यांची अधिकृत संपत्ती केवळ लाखांच्या घरात असल्याचे माहितीवरून दिसून येते.
West Bengal Election Results 2026 LIVE Updates : पश्चिम बंगालमध्ये भाजपा बहुमताजवळ! अनेक वर्षांनंतर डाव्यांनीही उघडलं खातं; आताचे कल काय?