-
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी २ लाख १४ हजार ९३ इतक्या प्रचंड मताधिक्क्याने ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
-
अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेतील निधनानंतर ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न झाले, मात्र २२ उमेदवारांनी माघार न घेतल्याने मतदान प्रक्रिया पार पडली.
-
विशेष म्हणजे, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी प्रस्थापित केलेला मताधिक्क्याचा विक्रमी टप्पा ओलांडून सुनेत्रा पवार यांनी बारामतीमध्ये आतापर्यंतचे सर्वात मोठे मताधिक्क्य मिळवण्याचा नवा मान मिळवला आहे.
-
सुनेत्रा पवार यांच्या विजयानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. “बारामतीकरांनी सुनेत्रा पवार यांना दोन लाखांहून अधिक विक्रमी मताधिक्क्याने विजयी करत अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. अजित पवार यांनी बारामतीच्या विकासाचे आणि प्रगतीचे पाहिलेले स्वप्न सुनेत्राताई पूर्ण करतील यात शंका नाही,” असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुनेत्रा पवार यांच्यावर मोठी जबाबदारी असल्याचे सूचित केले आहे.
-
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनीही सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे स्वागत केले आहे. “देशातील आजवरचा २.१४ लाख मताधिक्क्याचा विक्रम मोडीत काढून २.१८ लाख एवढ्या विक्रमी मताधिक्क्याने बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्याबद्दल सुनेत्राकाकींचं मनःपूर्वक अभिनंदन! हा विजय म्हणजे अपेक्षेप्रमाणे बारामतीकरांनी दाखवून दिलेलं अजितदादांवरील प्रेम आणि त्यांना कृतज्ञतेने वाहिलेली आदरांजली आहे,” असे रोहित पवार यांनी नमूद केले.
-
निवडणूक निकालानंतर सुनेत्रा पवार यांनी भावूक प्रतिक्रिया दिली. “अजित दादांनंतरची ही पहिली निवडणूक होती, मला कधीही वाटलं नव्हतं की मला अशा प्रकारच्या निवडणुकीला सामोरे जावे लागेल. मन खरंतर खूप भरून येत आहे. प्रत्येक बारामतीकराने दादांनी केलेल्या विकासकामांचे प्रतीक म्हणून आज त्यांना भावांजली वाहिली आहे,” असे त्या म्हणाल्या.
-
सर्व विरोधी उमेदवारांना मिळून अवघी ४,८३७ मते प्राप्त झाली आहेत.
West Bengal Election Results 2026 LIVE Updates : ममता बॅनर्जींनी घेतली ५ हजार मतांची आघाडी! निकालाचा सस्पेन्स वाढला; शेवटच्या ७ फेऱ्या ठरणार ‘गेमचेंजर’?