-
आज गोवा घटकराज्यदिन साजरा होत आहे. गोवा ३० मे १९८७ रोजी स्वतंत्र राज्य म्हणून उदयास आले. (फोटो – Canva)
-
देशाच्या स्वातंत्र्यानंतर देखील १४ वर्षे गोवा पोर्तुगीज अंमलाखालीच होता. (फोटो – Canva)
-
पोर्तुगीजांच्या जोखडातून गोवा मुक्त व्हावा यासाठी गोवा मुक्ती आंदोलन झाले. (फोटो – Canva)
-
राम मनोहर लोहिया यांनी टाकलेल्या क्रांतीच्या ठिणगीनंतर गोमंतकीयांच्या संघर्षानंतर १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा पोर्तुगिजांपासून स्वतंत्र झाला. (फोटो – X/ Goa Tourism)
-
सुरवातीची अनेक वर्षे गोवा हा केंद्रशासित प्रदेश होता. गोवा हा प्रदेश सुरवातीची १० वर्षे केंद्रशासित ठेवावा आणि त्यानंतर तो स्वतंत्र ठेवावा की महाराष्ट्र किंवा कर्नाटकात त्याचे विलीनीकरण करावे, याबाबत निर्णय घेण्याचे ठरले होते. (फोटो – Canva)
-
गोवा आणि दमण व दीव मिळून एकच केंद्रशासित प्रदेश होता. १६ जानेवारी १९६७ रोजी जनमत कौल घेण्यात आला. या जनमत कौलात नागरिकांना गोव्याचे इतर राज्यांमध्ये विलीनीकरण करण्याविरोधात मतदान केले. (फोटो – Google Photo)
-
ऑक्टोबर १९७६ मध्ये पुरुषोत्तम काकोडकर यांनी लोकसभेत गोव्याला घटक राज्याच्या दर्जा देण्याबाबतचे खासगी विधेयक मांडले. (फोटो – X/ Goa Tourism)
-
३० मे १९८७ रोजी राजीव गांधी पंतप्रधान असताना गोव्याला पूर्ण राज्य बनविणारे विधेयक मंजूर करण्यात आले. (फोटो- X/Mallikarjun Kharge)
एकेकाळी करोडपती होते, आज रस्त्यावर झोपतात! आजोबांनी सांगितलं, फक्त ‘या’ गोष्टीमुळे झाली वाईट अवस्था; VIDEO पाहून धक्का बसेल…