-
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आज ‘कॉकरोच जनता पार्टी’ने जोरदार आंदोलन पुकारले.
-
झुरळांचे मुखवटे घालून आणि हातात फुले घेऊन प्रामुख्याने शेकडो तरुण या आंदोलनात गोळा झाले होते.
-
शालेय विद्यार्थीसुद्धा आपल्या पालकांसोबत या आंदोलनात सहभागी झाले होते.
-
आंदोलकांमध्ये बहुतांश शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुण नोकरदार होते.
-
परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांची जबाबदारी मागणाऱ्या ‘सीजेपी’ या तरुणांच्या आंतरजाल चळवळीने हे आंदोलन आयोजित केले होते.
-
जंतरमंतरवर जमा झालेले निदर्शक घोषणाबाजी करत शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते.
-
‘कॉकरोच जनता पार्टी’ (सीजेपी) चे संस्थापक अभिजित दिपके दिल्लीतील आंदोलनात सामील झाले.
-
दिपके यांनी समर्थकांना शिस्त बाळगण्याचे आणि आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन केले होते.
-
मागण्या सोडवण्याऐवजी संघटनेच्या सामाजिक माध्यमांवर लक्ष केंद्रित केल्याबद्दल त्यांनी सरकारवर टीका केली.
-
कार्यकर्ते सोनम वांगचुक लवकरच आंदोलनात सामील होणार असल्याचे सांगत त्यांनी वांगचुक यांचे आभार मानले.
-
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून दिल्लीत १,००० पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
Robert Kiyosaki: “आता पैशाच्या इतिहासातील सर्वात कठीण काळ सुरू होतोय!”; ‘रिच डॅड पुअर डॅड’च्या रॉबर्ट कियोसाकींचे भाकीत