-
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांचा आज (१३ जून) वाढदिवस आहे.
-
त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे.
-
याचदरम्यान, त्यांचे चुलत बंधू व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते अमित ठाकरे हेदेखील आदित्य ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी ‘मातोश्री’वर पोहोचले.
-
अमित ठाकरे यांनी थेट ‘मातोश्री’वर जात आदित्य ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
-
या भेटीदरम्यान अमित ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंना एक सुंदर रोपटे भेट म्हणून दिले.
-
सध्या या दोन्ही भावांच्या भेट अन् गळाभेटीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत आणि त्यावरून जोरदार चर्चा सुरू आहे.
-
या भेटीमुळे ‘मातोश्री’वर एक वेगळेच कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे वातावरण पाहायला मिळाले.
-
दोन्ही भावांमधील हे प्रेमळ आणि कौटुंबिक नाते पाहून सोशल मीडियावर नेटीझन्सकडून या भेटीचे भरभरून कौतुक होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: आदित्य ठाकरे आणि शिवसेना/इन्स्टाग्राम)
“अनेक जोडप्यांसाठी आदर्श आहेत….”, भाग्यश्रीने केलं रितेश-जिनिलीयाचं कौतुक; ‘राजा शिवाजी’च्या सेटवरचे किस्से सांगत म्हणाली…