-
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ६ खासदारांनी जाहीर प्रवेश केला.
-
यामध्ये संजय (बंडू) जाधव (परभणी), भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी), ओमराजे निंबाळकर (धाराशिव), संजय दिना पाटील (ईशान्य मुंबई), संजय देशमुख (यवतमाळ – वाशीम) आणि नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली) यांचा समावेश आहे.
-
हा संपूर्ण पक्षप्रवेश कायदा, संविधान आणि संसदीय परंपरांच्या चौकटीत राहूनच पार पडल्याचे यावेळी एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
-
“जून २०२२ मध्ये ४० आमदारांसह सुरू झालेल्या राजकीय उठावानंतरचा हा दुसरा मोठा उठाव आहे.
-
यावेळी एक नाही, तर ६ ‘टायगर’ आमच्यासोबत आले असून आम्ही थेट षटकार मारला आहे,” अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी या खासदारांचे स्वागत केले.
-
ठाकरे गटातून बाहेर पडताना या सर्व खासदारांनी “विकासकामांसाठी निधी मिळत नाही” असे कारण दिले होते. मात्र, ‘मुंबई Tak’ ने संसदेच्या अधिकृत आकडेवारीच्या आधारे केलेल्या विशेष पडताळणीत एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
-
खासदारांचा हा दावा अधिकृत आकडेवारीच्या अगदी उलट असल्याचे दिसत आहे. या ६ खासदारांना एकूण १०० कोटींपेक्षा जास्त निधी मिळाला होता, त्यापैकी अवघा १३.७८ कोटी रुपये निधी खर्च झाला असून तब्बल ८६ कोटींहून अधिक निधी अद्याप अवापरित (शिल्लक) आहे.
-
नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली)
मिळालेला एकूण निधी – १९ कोटी
झालेला खर्च – ५.७ लाख -
संजय दिना पाटील (ईशान्य मुंबई)
मिळालेला एकूण निधी – १४.७ कोटी
झालेला खर्च – १५ लाख -
भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी)
मिळालेला एकूण निधी – १४.७ कोटी
झालेला खर्च – ७१ लाख -
संजय देशमुख (यवतमाळ-वाशीम)
मिळालेला एकूण निधी – १८.६ कोटी
झालेला खर्च – १.४२ कोटी -
संजय जाधव (परभणी)
मिळालेला एकूण निधी – १४.७ कोटी
झालेला खर्च – ३.८ कोटी -
ओमराजे निंबाळकर (धाराशिव)
मिळालेला एकूण निधी – १८.५ कोटी
झालेला खर्च – २ कोटी
तुकाराम मुंढे हॉटेलमध्ये जेवायला गेले, ‘पनीर’ची भाजी मागवली अन्…; घडला भन्नाट प्रकार! म्हणाले, “मी आधीच सांगितलं होतं…”